पान:बाबुर.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पानिपत | हिंदुस्थानांत येऊन पानिपतावर आपल्या अतुल पराक्रमानें इब्राहिमखानाला खडे चारून दिल्लीचे तख्त काबीज करणारा बाबुर काबूलहून निघाला आणि दिल्लीचा दिल्लीपति झाला असे मात्र नव्हते. ही घटना अघटितपणे घडली असे नव्हे. तो येत येत आला. इ. स. १५१९ मध्ये त्याने बाजउर लोकांच्यावर चाल केली आणि त्यांचा अजिंक्य किल्ला दोन-तीन तासांत आपल्या तोफखान्याच्या सहाय्यानं हां हां म्हणतां घेतला. त्या लोकांची सरसहा कत्तल केली. या वेळी त्याने कमालीची क्रूरता दाखविली; पण नंतर मात्र त्याने आपल्या निष्ठुरतेस पायबंद घातला. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला हिंदुस्थानाविषयी आपलेपणा वाटे. त्याची अशी महत्त्वाकांक्षा असे की, 4 आपण हिंदुस्थानचे राजे होणार आणि तेही ज्या प्रांतांवर तैमूरने आपले राज्य संस्थापिलें होते तेथे. त्या प्रांतांतील प्रजा ती तैमूरची प्रजा आणि तैमूर माझा कुलपुरुष, तेव्हां तैमूरचे प्रजाजन ते माझेही प्रजाजन तेव्हां त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होईल अशी दक्षता मी घेतली पाहिजे आणि खरोखरीच त्याने तशी काळजी घेतलीही.

  • मी तैमूरचा हक्कदार वारस असल्याकारणाने त्याने आपल्या ताब्यांत घेतलेले प्रांत बिनशर्त माझ्या ताब्यात देण्यात यावेत' अशा मागणीचा एक