पान:बाबुर.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दारूबाज | हिंदुस्थानकडे निघालेल्या बाबुराच्या सैन्याची धाड प्रथम बाजउर नांवाच्या किल्यावर पडली. बिचारे बाजउर लोक अत्यंत रानटी होते. ते इस्लामा धर्माचेही नव्हते. ते धनुष्य-बाणांच्या युद्धांत तरबेज होते. त्यांना तोफखाना _ आणि तोफा ही काय चीज आहे हे सुद्धा माहीत नव्हते. त्यामुळे बाबुराच्या | तोफखान्याने त्यांचा धुव्वा उडविला. त्यांची मुले-माणसे कैद करण्यांत आली, आणि ३ ० ० ० बाजउर लोकांची कत्तल करण्यांत आली. सुनी पंथ सोडून शिया पंथ धारण करणा-या बाबुरास विधर्मीय बाजउर लोकांच्या कत्तली करून धार्मिक समाधान वाटत होते. त्याच्या रक्तातील मोगली क्रूरता आतां प्रगट झाली होती. बाबुरच्या तोफखान्याने बाजउर लोकांचा दोन-तीन तासांत धुव्वा उडविला. त्याने तयार केलेल्या त्याच्या तोफखान्याचे अचाट सामथ्र्य त्यास या ठिकाणी प्रथम प्रतीत झाले. या वेळी बाबुरास दारूच्या व्यसनाने चांगलेच पछाडले होते. चिक्कार दारू पिऊन झिंगून जाण्यांत त्याला फार आनंद होत होता. दारूच्या जोडीला तो भांगही घेत असे. या मैफली अनेक वेळां चालत. एकदां ही मंडळी सहल करावयास गेली असता तेथे त्यांनी मदिरापानाचा विक्रम गाजविला. दुपारपासून मदिरापानास सुरुवात झाली. तो तडाखा एकसारखा चालू होता