पान:बाबुर.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| तोफेचे ओतकाम १०१ wwwwwww वेळी बाबुर स्वतः त्या ठिकाणी हजर होता. तोफेचा साचा दाबून तयार झाला होता. त्याच्या भोवताली लोखंडाचा रस तयार करणान्या आठ भट्टया होत्या. त्या भट्टयांपासून तप्त लोहरस नीट वाहात जावा म्हणून बारकाल्या सुबक वाटा करण्यांत आल्या होत्या. बाबुर त्या ठिकाणी येतांच तप्त लोहरसाचे मार्ग खुले करण्यांत आले. त्याबरोबर रस व्यवस्थितपणे खाचांत जाऊ लागला. कांहीं वेळाने रस येण्याचे थांबलें, पण सांचा पुरा भरला गेला नाही. तेव्हा उस्ताद अल्लीचे माथे भडकले. काय करावे हेच त्याला सुचेना. थोड्या नजरचुकीने ही गोष्ट झाली, पण ती त्याच्या मनाला फारच झोंबली. तो त्या तप्त रसांत उडी घेऊ लागला, पण त्याला आवरण्यांत आले. त्याचा सन्मान करून त्याची समजी केली व तो शांत झाला. नंतर दोन दिवसांनी रस निवाल्यावर सांचा उघडून पाहतात तो तोफेचा एक भाग–जेथून गोळ बाहेर पडतो तो -उत्तम प्रकारे कोठेही सोस न येता ओतला गेला होता. ही बातमी उस्ताद अल्लीने बाबुरास मोठ्या आनंदाने पाठविली व असेही कळविले की, ज्या भागांत दारू ठांसली जाते तो दुसरा भाग तयार करणे फार सोपे आहे. ह्या अपु-या रसामुळे तोफेचा एकच भाग ओतला गेला. जरा त्रास झाला हे खरे पण या वेळी असा नवा शोध लागला की, तोफा दोन भागांतच चांगल्या प्रकारे ओतल्या जातात. यानंतर पुढे तोफा दोन भागांत करू लागले. | आतां ही दोन भागांत तयार झालेली तोफ प्रत्यक्ष उडवून पाहण्यांत आली. बाबुर त्या ठिकाणी गेला त्या वेळी संध्याकाळच्या प्रार्थनेचा समय होता. तेव्हां त्या नव्या तोफेस बत्ती देण्यात आली. तोफ धडाडली पण तिने सोळाशें पावलांचा रेटा खाल्ला. त्या वेळी तोफेस फारच अपूर्वता होती. हा उस्ताद अल्ली चांगलाच गोलंदाज होता. दिवसांतून सोळा बार काढणे त्या वेळी मोठ्या आश्चर्याचे होते. बाबुराच्या जवळ तोफखाना हैं फार मोठे प्रभावशाली आयुध होते आणि आतां त्याने आपला मोर्चा हिंदुस्थान कडे वळविला होता.