पान:बाबुर.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दारूबाज १०३ प्याल्यामागून प्याले घशाखाली गटागट जात होते. क्षणाक्षणाला नशा चढत होती. आपण कोठे आहोत, काय करीत आहोत याची शुद्ध नव्हती. संध्याकाळ झाली, निजण्याचा समय झाला, मध्यरात्र टळली, उत्तर रात्रीस सुरुवात झाली, पहाटेचा समय झाला, तरी नरड्यांत दारू ठांसण्याचा कार्यक्रम चालू होता. कांहीं • दारू चढली नाहीं ' म्हणून तर कांहीं • दारू फार चढली' म्हणून प्याल्यामागून प्याले ढोशीत होते. वेडीविदरी बडबड आणि आरडाओरडा चालू होता. बाबुराच्या या कैफवाज मंडळाचा असा एक विशेष होता की, या कैफवाजांत दोन भाग होते. एक दारू पिणारांचा व दुसरा भांग पिणारांचा. दारू पिणारांचे भांग पिणाच्यांशी जमत नसे, तर भांग पिणारे दारू पिणास नांवे ठेवीत. पण बाबुर सम्राट् होता व त्याच्या ठिकाणी या दोन्ही बाजींचा समसमान संयोग झाला होता. आकंठ मदिराप्राशनानंतर हें बेशुद्ध स्थितीतील मदिरामंडळ घोड्यावर स्वार होऊन आपल्या तळाकडे निघालें. जो तो पिऊन लास झाला होता. क्षणांत डावीकडे रेल तर क्षणांत उजवीकडे रेल; अशा स्थितींत हे स्वार डकाव डकाव करीत चालले होते. मदिरामंडळाच्या या स्वारीला आग्यावेताळाच्या स्वारीचे रूप जवळ जवळ आले होते. फक्त एकाच गोष्टीची कमतरता होती. त्यांच्या हातांत पेटलेले पलिते नव्हते. पण इतक्यांत टूम निघाली की, प्रत्येकाने हातांत चुडे घ्यावेत. कल्पना निघावयाचाच अवकाश की त्याची अंमलबजावणी व्हावयाचीच. प्रत्येकाने आपल्या हातांत पेटलेले चुडे घेतले आणि हैदोस धुल्ला' करीत ते मंडळ आपली वाट चालू लागले. सर्व अत्याचार, अनाचार पुरे झाल्यानंतर थकल्या भागल्या स्थितीत थंड होत होत ते आपल्या निवासस्थानी दाखल झाले व झोपी गेले. या वेळी बाबुरास नशा बेसुमार चढली होती. दुसरे दिवशी या गोष्टी लोक मोठ्या खुलावटीने सांगू लागले, पण बाबुरास त्याचे कांहींही स्मरण नव्हते. दारूला स्पर्शसुद्धां न करणारा हा गृहस्थ त्या व्यसनांत इतका डुंबून गेला, हैं जसे खरे तसेच हे व्यसन सोडण्याचे त्याच्या मनांत येताच त्याने ते