पान:बाबुर.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० बाबुर | काबूल घेतल्यापासून म्हणजे इ. स. १५०४ पासून बाबुराच्या मनांत हिंदुस्थानविषयी विचार चालू होते; पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या नाही त्या कारणांनी लांबणीवर पडत होती. केव्हां कांहीं तरी राजकारणच निर्माण व्हावे, केव्हां त्याच्या अमीरांना हा विचारच आवडू नये तर केव्हां त्याच्या नातेवाइकांनीच मोडता घालावा, असे चालले होते. पण बाबुराची दृष्टि मात्र हिदुस्थानावरून केव्हांच ढळली नव्हती. तो एकेक पाऊल हिंदुस्थानाकडे टाकीत होता. इ. स. १५०४ मध्ये पेशावरच्या बाजूने खैबर घाटांतून तो कोहाटपर्यंत आला. त्याला या वेळीं लूट पुष्कळच मिळाली. इ स. १५०७ मध्ये तो जलालाबादपर्यंत आला. इ. स. १५ १४ ते १५:१९ बाबुरास उत्तम प्रकारचा अनुभव मिळाला. त्याने शहा इस्माइलच्या तोफखान्याचा पराक्रम स्वतः अनुभवला. त्याने उस्ताद अल्लीला आपल्या पदरी ठेऊन त्याच्या देखरेखीखाली स्वतःसाठी फिरेंगी जातीच्या तोफांचा तोफखाना तयार केला, आणि त्याच्यावर उस्ताद अल्लीची नेमणूक केली. शिया व सुनी या धर्मपंथांच्या धांदलीत त्याचे समरकंदचे सिंहासन गेले, पण भारतवर्षांतील गौरवपूर्ण व वैभवशाली हस्तिनापूरचे तख्त या तोफखान्याने त्यास हस्तगत करून दिले. इ. स. १५२० ते १५२५ च्या दरम्यान मुस्तफा नांवाचा दुसरा एक गोलंदाज बाबुरास मिळाला. अशा त-हेने बाबुराचे लष्करी सामथ्र्य बिनतोड झाले. बाबुरानंतर शंभर वर्षांनी मराठ्यांना स्वराज्य संस्थापन करून देण्याच्या शककर्त्या शिवाजीची भवानी तलवार त्यांच्याच देखरेखीखाली तयार झाल्याचे वाचावयास मिळाले असते तर आमचा आनंद गगनात मावला नसता, पण बाबुराच्या बाबतीत तसे वाचावयास मिळते हा त्याचा विशेष आहे. हिंदुस्थानच्या रणभूमीवर अचाट पराक्रम गाजविणा-या फिरंगी नांवाच्या तोफांचे ओतकाम केव्हां केव्हां बाबुराच्या समक्ष उस्ताद अल्लीच्या देखरेखीखाली चाले. इ. स. १५२६ च्या नोव्हेंबरमध्ये एक तोफ ओतली, त्या