पान:बाबुर.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तोफेचे ओतकाम बाबुराच्या आयुष्याचे हे चढ-उतार पाहिले की मोठा अचंबा वाटतो. त्याचा आयुष्यातील हा परिस्थितीचा लंबक या टोंकापासून त्या टोकापर्यंत एकसारखा हेलकावे खात होता. बाबुरच्या आयुष्याचे घड्याळ आपले कांटे फिरवीत होते. हे घड्याळ फार मोठे होते. भाग्यभानूने माध्यान्ह गांठली म्हणजे त्याचे ठोके एवढ्या जोराने पडत की, त्याच्या आवाजाने बाबुराचे मित्र आनंदाने डोलत व शत्रूची अंतःकरणे हबके खात; पण लगेच बारानंतर पुन्हा सामसूम आणि त्याची किटकिट पुन्हां चालू होई. बाबुरास समरकंदच्या सिंहासनावरून त्याच्या सुनी प्रजेनें फेकून दिले, पण ही राज्यक्रांति प्रजेलासुद्धां भयंकर जाणवली. प्रांतचे प्रांत बेचिराख झाले. खाण्याला अन्न भेटेना का प्यायला पाणी मिळेना. पोटाची आग इतकी भडकली की, ती शमविण्यासाठी जित्याने मेल्यास खावे आणि मेल्याशेजारी सताड पाय पसरून स्वर्गाची वाट धरावी. महामारीचा झपाटा तर असा उठला की, तिच्या भक्ष्यस्थानी असंख्य माणसे पडली. हिवाळ्यालाही आतांच फावले आणि बर्फवृष्टि अशी झाली की, सपाट भूमीचीं टेकाडे आणि टेकाडांची सपाट भूमि झाली. अस्मानी आणि सुलतानीचा तडाखा असा जोडीने चालू होता की त्याला तोड नव्हती.