पान:बाणभट्ट.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५२ ) ( पक्ष ) तेजस्वी बाणच ( शर ) केवि ( पक्षी वगैरे प्राणी ) यांस गर्व- रहित करतो, मग योजिलें आहे वाणसंधान ज्यानें असा व्याध जवळ अस ल्यावर तो त्याचा गर्व हरण करील ह्मणून काय सांगावयाचें आहे ? " ह्या पद्यांतील बाणकविपक्षी पुलिन्द शब्दाचा अर्थ काय असावा, ह्मणून जुन्या व नव्या नांवाजलेल्या संस्कृतज्ञांस मी विचारिलें, परंतु कोणासहि त्याचा उलगडा करतां आला नाहीं. काश्मिराकडच्या वगैरे प्रतीत असलेलें बाणपुत्राचें नांव कळून आल्यामुळे वरील पद्याचा अर्थ सरळ व यथायोग्य लागून बाणपक्षी अर्थाची सुसंगति चांगली जुळते व वाणपुत्राचें नांव पुलिन्द- च असल्याबद्दलहि खात्री होते. बाणाच्या हातून दुर्दैवानें कादंवरी हा ग्रंथ शेवटास गेला नाहीं, तथापि त्यांतले त्यांत ही देखील संतोषाचीच गोष्ट समजली पाहिजे की कादंबरीचा पुढील भाग बाणपुत्रानें रचून पित्याच्या रचनेस शोभण्यासारखी कृति करून चांगलीच पूर्णता आणिली ! इतकी देखील दुसन्याच्या हातून खचित झाली नसती व असा सुंदर ग्रंथ तसाच अपुरा पडला असता. दुसऱ्याच्या कृतींत भर घालून ती बेमालूम करणें, हे तरी लहानसहान करामतीचें काम नव्हे ! उत्तरार्धाचे आरंभी वाणपुत्रानें नमन केले आहे त्यांत त्याची बरीच कुशल- ता दिसून येते. शिव आणि पार्वती यांची एकरूपता वर्णन त्याने त्यांनां नमन केले आहे. यावरून त्यांची जशी एकरूपता, तशी दोन भागांची एका- कारता केल्याचे त्यानें ध्वनित केले आहे ! तें पद्य हे होयः - " देहद्वयार्धरचनाघटितं शरीर- मेकं द्वयोरनुपलक्षितसंधिभेदम् । वन्दे सुदुर्घटकथा परिशेषसिद्धयै सृष्टेर्गुरू गिरिसुतापरमेश्वरौ तो " ज्यांच्या देहद्वयाचा संधिभेद कळून येत नाहीं, असे एकरूपी जगाचे मातापितर पार्वतीपरमेश्वर यांनां या पद्यांत वाणपुत्रानें नमन केलें आहे. यांत 'अनुपलक्षितसंधिभेदम्' हे शरीराचें विशेषण कवीनें मोठ्या मार्मिक- पणानें घातले आहे ! बाणभट्टानें कादंबरीच्या मुखानें चालू केलेलें विरहावस्थेचें भाषण १ उद्धृक (घुबड) वाचक कविशब्द असल्याबद्दल राजनिघंटूत आधार सांपडतो.