पान:बाणभट्ट.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५१ ). एकोहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेप्विवांकः " या न्यायानें गुणबाहुल्यापुढे अल्पस्वल्प दोषांची गणना करणे अगदीं अयोग्य होणार आहे. वाणपुत्र - पुलिन्द. इकडच्या लेखी व छोपील प्रतींत बाणपुत्राचें नांव कोठें नसल्यामुळे तें इकडे लुप्त होऊन गेलें आहे. डॉ० ब्युलर या युरोपीयन पंडितानें बाण- पुत्राचें नांव ' भूषणभट्ट ' अर्से छापून प्रसिद्ध करण्याचे धाडस केलें आहे. परंतु त्यास त्यानें खात्री होण्यासारखें प्रमाण दिलेले नाहीं. काश्मीरांतील जम्मु येथील ग्रंथसंग्रहालयांत शारदा ( काश्मिरी ) लिपीत भूर्जपत्रांवर असलेल्या कादंबरीच्या प्रतींत उत्तरभागाच्या शेवटीं बाणपुत्राचें नांव ' भट्ट पुलिन्द ' असें स्पष्ट आहे. ह्या प्रतीच्या शेवटीं शके १५६९ ( इ. स. १६४७ ) असा लेखनकालहि दिलेला आहे. उदेपूर व नाथद्वार येथील ग्रंथसंग्रहांतील प्रतींतहि बाणपुलाचें हेच नांव आहे. उदेपुरच्या प्रतीत 'पुलिन' असे आहे. परंतु तें पुलिन्दच असले पाहिजे. या ठिकाणीं लेखकाच्या प्रमादानें ' द ' चा काना होऊन तो 'न १ ह्या व्यंज- नास मिळाला असावा. याप्रमाणे लेखकांच्या व नांवाचें वगैरे महत्त्व न जाणणारांच्या आज्ञानामुळे कांहीं ग्रंथांच्या शेवटीं ग्रंथकारांची नांवें वगैरे देखील गाळून टाकलेली आढळतात! दुसरे, धनपालाच्या वाण पुलिन्द - प्रशंसापर पद्या चाहि पुलिन्द ह्या नांवास चांगला आधार मिळतो. सूक्तिमुक्तावलि वगैरे ग्रंथांत आधार साप - डतो तो असाः - - - " केवलोपि स्फुरन्वाणः करोति विमदान्कवीन् । किं पुन: क्लृप्तसंधानपुलिन्दकृतसन्निधिः " ॥ तीक्ष्णबुद्धि वाणकवि हाच कवींचा गर्व हरण करतों (कादंबरीतील वगैरे कवित्वानें) मग कल्पिलें आहे अनुसंधान उत्तर भागाचे) ज्याने असा पुलिन्द ( बाणपुत्र ) त्याजवळ असल्यावर तो कवींचा गर्व नाहींसा करील ह्मणून काय सांगावयाचे आहे ? १ संस्कृत प्रोफेसरांनी कादंबरी छापण्याच्या वेळी बागेपुवाच्या नांवाबद्दल नीट' वाटाघाट करून ते द्यावयास पाहिजे होते, परंतु तसे त्यांनी कोलू नाहीं भोर