पान:बाणभट्ट.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५३ ) त्याच्या पुत्रानें त्याच नमुन्यावर पुढे चालवून पित्यानें रचलेल्या पूर्वार्धाशीं आपलें उत्तरार्ध 'अनुपलक्षितसंधिभेदम्' असेंच जमवून दिले आहे, यांत कांहीं संशय नाहीं ! तसेंच तेथें दूसरे पद्य आहे. त्यांतहि वरील अर्थाचेंच पर्यायानें समर्थन केले आहे व तेंहि खुबीदार आहे:- “ गंगां प्रविश्य भुवि तन्मयतामुपेत्य- स्फीताः समुद्रमितरा अपि यान्ति नद्यः । आसिंधुगामिान पितुर्वचनप्रवाहे क्षिप्ता कथानुघटनाय मयापि वाणी " || गंगत इतर नद्यांचा प्रवाह मिळाला असतां तद्रूप होऊन गंगारूपानेंच समुद्रापर्यंत जातो, त्याचप्रमाणे गंगेसारख्या ( प्रसन्न व मधुर पित्याच्या ) वाणीरूप गंगेच्या प्रवाहांत मीहि आपली वाणी मिसळून दिली. अर्थात् ती तद्रूप झाली ह्मणून सांगावयास नकोच ! पित्याच्या सहवासामुळे व त्याजवळच त्यानें अध्ययन करून त्याच्या ग्रंथांचें परिशीलन केले असल्यामुळे व शेवटच्या असाध्य अवस्थेंतहि त्यानें सांगितलेल्या माहितीप्रमाणे आणि दर्शविलेल्या दिशेप्रमाणे त्याचे पुत्रास पित्याचा अवशिष्ट ग्रंथ चांगल्या रीतीने शेवटास नेतां आला यांत कांहीं संशय नाहीं ! -- " गद्ये कृतेऽपि गुरुणा तु तथाक्षराणि- यन्निर्गतानि पितुरेव स मेऽनुभावः । एकप्लवामृतरसास्पदचंद्रपाद- संपर्क एव हि मृगांकमणेद्रवाय " || जसे चंद्रकांतमण्याच्या द्रवास अमृतरसरूपी चंद्राच्या किरणांचा संपर्क कारण होय, त्याप्रमाणेच पित्यानें केलेल्या गद्यमयग्रंथांतल्यासारखी अक्षरे (वाणी) मजपासून निघण्यास पित्याचा प्रभाव ( संपर्क ) च कारण होय ! " बीजानि गर्भितफलानि विकासभाञ्जि वप्वेव यान्युचितकर्मबलात्कृतानि उत्कृष्टभूमिविततानि च यान्ति पोषं तान्येव तस्य तनयेन तु संहृतानि " || ज्यांच्या अंतःस्थ फलें आहेत अशीं चांगली बीजें सुपीक भूमींत माळ्यानें लावली असतां व त्यांस उदकादिक घातले असतां तीं पोसून ग्रहण करण्यास