पान:बाणभट्ट.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५० ) शब्दार्थयोः समो गुम्फः पांचाली रीतिरिष्यते । शीलाभट्टारिकावाचि बाणोक्तिपु च सा यदि ॥ श्लेषे केचन शब्दगुम्फविषये केचिद्रसे चापरेड- लंकारे कतिचित्सदर्थविषये चान्ये कथावर्णने । आसर्वत्र गभीरधीरकविताविंध्याटवीचातुरी- संचारी कविकुम्भिकुम्भभिदुरो बाणस्तु पंचाननः || श्री चन्द्रदेव कस्यापि अशा अनेक सहृदय थोर कवींनी वाणकवीची तारीफ केली आहे, या- वरून तो कविश्रेष्ठ असल्याबद्दल निराळे सांगावयास नकोच. आतां हर्ष- चरितांत व कादंबरींत क्वचित् ठिकाणी अप्रसिद्ध शब्दांचे श्लेष, व कांहीं ठिकाणीं लांब लांब समास व वर्णनेंहि आहेत. हे प्रकार ह्मणजे मनास अग दींच कंटाळा उत्पन्न करीत नाहीत; असेच केवळ ह्मणतां येणार नाहीं. तसेंच वर्णनाच्या भरांत कोठें कोठें असंभाव्यतेचाहि प्रकार भासतो. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी कविसंप्रदायास अनुसरून असल्यामुळे त्या विशेष दूषणाई आहेत असे ह्मणतां येत नाही. साधारण व्युत्पन्नास कादंबरी ही कठिण वाटण्याचा संभव आहे; परंतु इचा जसा जसा परिचय होत जातो, तसा तसा तिचा कठिणपणा कमी होत जातो. कादंबरीच्या संविधानकांत गुंतागुंत व दूरान्वय असल्यामुळे वाचकांस घोटाळा वाटतो, असें युरोपीय- नांचें मत आहे, परंतु आह्मा आर्यलोकांस तसे न वाटतां एकप्रकारची चित्ताकर्षक चमत्कृति वाटून त्याबद्दल कौतुकच वाटतें ! एका संस्कृतकवीनेंहि वाणभट्टाच्या कवितेस उद्देशून अर्से झटलें आहे :- " सहर्षचरिता शश्वत्कृतकादंबरीकथा । वाणस्य वाण्यनार्येव स्वच्छंदं भ्रमति क्षितौ । ” 'राजशेखर ' यांत ' अनार्या ' हें वाणीचें उपमान केले आहे, परंतु तें कादंबरी ( मद्य ) स्वच्छंदभ्रमणे ह्या श्लेषाकरितां व स्वच्छंदभ्रमण याकरितां योजले असावें. हें तर बाणाच्या ( धावकाच्या ) अव्याहत गतीचें दर्शकच आहे ! अस क्वचित् ठिकाणीं असें कांही असले तरी - - १ ह्या विदुषीचाहि ग्रंथ कोर्डे उपलब्ध असल्याचें समजले नाहीं !