पान:बाणभट्ट.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४९ ) फारच उपयोग झाला असता; परंतु मृत्यूनें त्याजवर अकालींच झडप घात- ल्यामुळे मोठीच हानि झाली, त्यास इलाज नाहीं ! ' कालोहि दुरतिक्रमः ' कालाचें अतिक्रमण कोण करणार आहे ? ' सृजति तावदशेषगुणाकरं पुरुषरत्नमलंकरणं भुवः । तदनु तत्क्षणभंगि करोत्यहो अहह कष्टमपंडितता विधेः । भर्तृहरि . पृथ्वीला अलंकारभूत अशा गुणवान् पुरुषास उत्पन्न करून तो रंगारूपास येऊन पोहोंचतो न पोहोंचतो तोच मृत्यूची त्यावर झडप पडावी ! असेंच जर दैवदुर्विलसित आहे तर तेथें काय इलाज आहे ? बाणकवीची थोर थोर कवींनीं केलेली प्रशंसा व या संबंधानें दोन शब्द. बाण हा गद्यरचनेंत प्रवीण असल्याचे आढळून येतें. त्याप्रमाणे पद्यरचनेंत असल्याचे आढळत नाहीं, अर्से कोणाचें मत आहे; तथापि त्याचे सर्व ग्रंथ उपलब्ध होऊन पाहण्यास सापडल्याखेरीज याविषय निश्चित मत ठरविणें वाजवी नाहीं. खाली दिलेल्या थोड्या पद्यांवरूनदेखील तो पद्यरचनेंतह निष्णात होता असे मला वाटतें. बाणभट्टाची थोर थोर संस्कृतकवींनी मोठी प्रशंसा केली आहे, ती पुढील पद्यांत आढळून येईल -- " जाता शिखंडिनी प्राक् यथा शिखंडी तथावगच्छामि । प्रागल्भ्यमधिकमाप्तुं वाणी वाणो बभूवेति || गोवर्धनाचार्य. रुचिरस्वरवर्णपदा रसभाववती जगन्मनो हरति । तरिक तरुणी नहि नहि वाणी बाणस्य मधुरशीलस्य || धर्मदास. केवलोऽपि स्फुरन्वाणः करोति विमदान्कवीन् । किं पुन: क्लृप्तसंधानपुलिंदकृतसन्निधिः ॥ शश्वद्वाणद्वितीयेन नमदाकारधारिणा धनुषेव गुणाढ्येन निःशेषो रंजितो जनः । धनपाल. त्रिविक्रमभट्ट.