पान:बाणभट्ट.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६ ) बुद्धानें आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्यानें वैदिकादि सर्व इतर धर्मावर आपले वर्चस्व करून सोडलें होतें. त्याच्यांत विलक्षण गुण होते, त्यामुळें सर्व जग अज्ञानांत बुडालें आहे असे त्यास दिसले. मग तो बराच वेळ विचारांत गढून गेला असतां तेथें एक पुरुष त्याचे दृष्टीस पडला. तेव्हां दोघांचा बराच वेळ संवाद झाल्यावर त्या पुरूषानें सिद्धार्थास म्हटलें, 'रोगी वैद्याकडे आपला रोग दूर करण्याकरितां गेला नाहीं तर त्यांत वैद्याकडे काय दोष आहे ? याप्रमाणे प्रपंचांतील दुःखांतून मुक्त होण्याकरितां जे उपाय आहेत ते न केले तर त्याचा बोल दुसऱ्या- कडे काय आहे ? हे सिद्धार्था, तूं धर्मराज असून धर्मस्थापनेकरितां उत्पन्न झाला आहेस. इतकें बोलून तो पुरुष अदृश्य झाला. त्या पुरुषाच्या ह्या भाषणानें सिद्धार्थाच्या अंतःकरणांत बराच प्रकाश पडला व तो त्या विचारांत अगदीं निमग्न झाला. पुढे एके दिवशीं राजवैभव व त्यापासून प्राप्त होणारी सर्व नश्वरसुखें सोडून जावयाचें, असा त्यानें निश्चय केला. जाते वेळी त्याला वाटले की एकदां आपल्या बालकास जवळ घेऊन मग जाण्याचें करावें. नंतर तो रात्री आपल्या स्त्रीच्या मंदिरां- त गेला आणि पाहूं लागला तों आपली सुंदर व तरुण स्त्री मुलास पोटाशीं घेऊन निजली आहे! तें पाहून त्याच्या मनांत आलें कीं, मीं जर या बालकास उचलून जवळ घेतले तर ही जागी होईल. याकरितां हें उपयोगी नाहीं. मग तो विरक्त झाला होता तरी त्या दोघांकडे पाहून त्याचा कंठ दाटून येऊन त्यास गहिंवर आल्यावांचून राहिला नाहीं ! नंतर तो तें विघ्न समजून त्या मोहपाशांत न गुंततां तेथून निघून गांवाबाहेर गेला. ऐहिक सुखाचा त्याग करणे आणि परमार्थ साधण्याकरितां स्त्रीच्या सहवासांतून मुक्त होणें हाच निर्वाणास पोचण्याचा मार्ग ! असे त्याचें मत होतें. तो प्रथम कोसलदेशांतून लोकांस उपदेश करीत करीत उरुवेला [ ह्या स्था- नास *बुद्धगया असे ह्मणतात, ] ह्या ठिकाणी गेला, तेथें जिकडे तिकडे वृक्ष, वल्ली, व स्वच्छ उदक हीं पाहून तें स्थान त्यास फारच आवडलें, तेथे एक्या पिंपळाच्या [ ज्यास बोधिवृक्ष किंवा ज्ञानवृक्ष असें झटले आहे, ] वृक्षाखाली त्यानें पांच वर्षे तपश्चर्या केली व त्यामुळे त्याचे अंतःकरणांत ज्ञानकला प्रकट होऊन त्यास साक्षा. त्कार झाला व तो बोधिसत्व [ज्ञानी] झाला, नंतर तो बुद्ध हिंसा न करणें, खरेपणानें वागणें वगैरे गोष्टींविषयीं- उपदेश करीत करीत मगध [बहार] देशांत गेला, त्याचा उपदेश ऐकणारांच्या मनावर इतका टसला कीं, मगधदेशचा राजा व दुसरेहि पुष्कळ थोर थोर लोक त्याचे शिष्य झाले, पुढे त्याचे शिष्यसंघ जिकडे तिकडे पसरून त्यांनी बौद्धमताचा प्रसार पुष्कळच केला, बुद्धानें काशीस वगैरे जाऊन आपल्या मताचा तेथेंहि प्रसार केला, त्यानें फिरून आपल्या आईबापांची व स्त्रीपुत्रांची भेट घेतली, परंतु पूर्वीचं नातें न धरितां त्यानें आपल्या घरी भिक्षा मागून त्यांच्या आग्रहावरून त्यांना इतर लोकांप्रमाणेच उपदेश केला, पुढे बुद्धाची स्त्री व पुत्र

  • बुद्धगया ही पाटणाचे दक्षिणेस आहे.