पान:बाणभट्ट.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६४ २७ ग ( २५ ) युरोपियन ग्रंथकार त्याचा काल - ईसवी सनापूर्वी चारशे सत्याहत्तर ( ४७७ ) वर्षे मानितात. सूर्यवंशांतल्या शाक्यराजांच्या वंशांत उत्पन्न झाला. त्याचे बापाचें नांव शुद्धोदन, व आईचें नांव मायादेवी असें होतें. अर्कबंधु शाक्यसिंह, शाक्यमुनि, शौद्धोदनि, मायादेवीसुत, गौतम, मारजित्, जिन, इत्यादि नांवें अमरादिकोशांत आहेत. या बरूनच विचार केला तरी बराच इतिहास लक्षांत येतो. आतां पाली भाषेतील बौद्ध पुस्तकांवरून इंग्रजीत भाषांतरें झाली आहेत. त्यांतील माहिती वरील माहितीशी मिळून शिवाय आणखीहि पुष्कळ माहिती त्यांत सांपडते. बुद्धाचा बाप शुद्धोदन. याचें राज्य बरेंच मोठें होतें. तो आपल्या प्रजेस कोणत्याहि प्रकारें दुःख होऊं नये ह्मणून फार काळजी घेत असे. त्याचे राज्यांत सर्व लोक सुखी होतें व व्यापारधंदा सुरळीत चालत असे. राजास पुत्र झाला तेव्हां सर्वोस फारच आनंद झाला. 'हा मुलगा फार ज्ञानी होईल व याचें परमार्थाकडे लक्ष लागेल, ' असें ज्योतिष्यांनी सांगितलें होतें. आपल्या मुलास लहानपणापासून विद्या शिकविण्याकडे राजाचें लक्ष असे. तो विद्वान् होऊन तारुण्यांत आल्यावर त्यानें आपल्या पसंतीने आपली स्त्री निवडावी झणून शेकडों सुंदर राजकन्या त्याच्या दृष्टीस पाडण्याची राजानें तजवीज केली होती. त्यांत. ' यशोधरा ' नांवाच्या राजकन्येनें चातुर्याने त्याचें मन आपल्याकडे वळविलें व तिजबरोबर सिद्धार्थाचा विवाह मोठ्या थाटानें झाला. आपल्या मुलानें नेहमीं आनंदांत रहावें, संसारसुखाचा उपभोग ध्यावा व राज्य करावें, असें राजाच्या मनांत असल्यामुळे मुलास उदासीनपणा येण्यास अल्प देखील कारण होऊं नये व त्याच्या दृष्टीस दुःखकारक प्रसंग पडूं नयेत ह्मणून, त्याबद्दल राजा फार काळजी घेत असे. सिद्धार्थबुद्ध याच्या पुत्राचें नांव ' राहूल' असें होतें. सिद्धार्थाचें घरी मोठें राजवैभव असतां लहानपणापासूनच त्याचें संसारांतील लक्ष उडालें होतें. एके दिवशीं तो रथांत बसून फिरावयास गेला असतां वाटेनें जरेमुळे विरूप झालेला एक वृद्ध मनुष्य, तसाच पुढें एक दुखणाईत, व त्यानंतर एक प्रेत, असे प्रकार त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हां त्यानें आपल्या पोक्त गाडीवानास अशी यांची दशा होण्याची कारणें विचारलीं. तेव्हां सर्व प्राणिमात्रास अशाच दशा भोगाव्या लागतात, असें त्यानें सांगितले. तें ऐकून सिद्धार्थास फारच वाईट वाटले आणि त्यास राज्यादि सर्व ऐहिक सुखांचा फारच तिटकारा वाटला. एके दिवशीं तो पलंगावरील मऊ बिछान्यावर पडला असतां येथील नश्वर स्थितीकडे त्याचे लक्ष जाऊन त्यास चैन पडेनासे झालें. तेव्हां तो आपल्या बागेत एका वृक्षाखाली जाऊन बसला व चिंतन करूं लागला, तेव्हां

  • शाकवृक्षप्रतिछन्नं वासं यस्माच्च चक्रिरे ।

तस्मादिश्र्वाकुवंश्यास्ते शाक्या इति बुधैः स्मृताः ॥ सुंदरानन्दचरित. • अमरकोशाची शाक्यसिंह शब्दावरची रायमुकुटाची टीका पहा.