पान:बाणभट्ट.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९९ ) ● चंद्रापीडास दृढालिंगन केले! त्यामुळे अमृतसिंचन केल्यासारखें त्याचें शरीर होऊन त्यास जीवकला प्राप्त झाली. मग तो कादंबरीस ह्मणाला, " हे भीरु ! भय सोड. तुझ्या अमृतस्पर्शानेंच मी जीवंत झालों ! तूं अमृतापासून उत्पन्न झालेल्या अप्सराच्या कुळांत उत्पन्न झालीस. याची तुला आठवण नाहीं काय ? हें माझें शरीर अविनाशी आहे, कादंबरीच्या स्पर्शानें तें सचेतन होईल या भाषणाचें तुला स्मरण नाहीं काय? आतां इतके दिवस तुझ्या हस्तस्पर्शानें मी जीवंत झालों नाहीं, याचें कारण शापदोष होय. आतां तो शाप संपला. तुझी प्रियसखी महात्रेता इच्या प्रियवल्लभाचाहि शाप संपला ! तुझ्या विरहानें पीडित अशा शूद्रक राजदेहाचा मी आतांच त्याग केला. " इतक्यांत वैशंपायनरूपी पुंडरीक शुकशरीराचा त्याग करून कपिंजला- सह तेथें आला. तेव्हां कादंबरी धावत गेली आणि तिनें पुंडरीक आल्याचें आनंदकारक वर्तमान महाश्वेतेस सांगितलें, इतक्यांत तोहि तेथें आला. तेव्हां चंद्रापीड, पुंडरीक, (वैशंपायन ) कादंबरी व महाश्वेता आणि त्यांचे मातापितर यांच्या आनंदास पारावार नाहींसा झाला. व ते सर्व वांछित सुखांत निमम राहिले ! पुढे कादंबरीनें एकांती "पत्रलेखेची काय वाट झाली ? " ह्मणून चंद्रापीडास विचारिलें असतां " ती माझी ( चंद्राची ) प्रिया रोहिणी होय. तिला माझा विरह सहन न होऊन माझ्या सहवासाकरितां तिनें यालोकी जन्म घेतले होतें, ती आतां चंद्रलोकीं गेली. " असें त्यानें सांगितले. 111 JAN 1994