पान:बाणभट्ट.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९८ ) वसतिहि देवनगरीसारखी दिसली | तेव्हां मला मोठा चमत्कार वाटला. मग मौन सोडून तिला विचारावें, असें जो माझ्या मनांत घोळत होतें, तो ती चांडाळकन्या मला घेऊन महाराजाकडे आली. तर ही कोण व हिनें मला पिंजण्यांत घालून येथे कशाकरितां आणिले ह्या गोष्टी समजण्याविषयीं महाराजाप्रमाणे मलाहि मोठे कौतुक वाटत आहे !" 66 ऐकून शूद्रकराजास अधिकच चमत्कार वाटला आणि त्यानें चांडाळ- कन्येस बोलावून आणण्यास सांगितले. ती आली तेव्हां तिच्या तेजानें शूद्रकराजा देखील निस्तेज पडल्यासारखा झाला ! मग ती ह्मणाली, “ हे चंद्रावतारी राजा ! ह्या शुकाचा व तूं आपला पूर्वीचा सर्व वृत्तांत ऐकिलास. हा पक्षिजातीत असतांहि कामांध होऊन व पित्राज्ञेचें उल्लंघन करून आपल्या प्रियेकडे चालला होता, हेहि त्याच्याच मुखानें तुला समजलें ! तर ह्या मूर्खाची जननी मी लक्ष्मी होय ! हा जाबालीच्या आश्रमांतून उडून जाऊं लागला, तेव्हां याच्या पित्यानें दिव्यदृष्टीनें पाहून मला सांगितलें, 'दुराचरणी प्राणी पश्चात्तापावांचून शुद्धीवर येत नाहीं, तर हें आरंभिलेलें कर्म शेवटास जाईपर्यंत तूं मनुष्यलोकीं जाऊन त्याला धरून ठेव. व जसा त्यास कृतकर्माचा पश्चात्ताप होईल असे कर. ' तेव्हां ऋषीच्या आज्ञे प्रमाणे हा कारटा वाटेवर यावा ह्मणून मीं याप्रमाणें केलें ! हल्लीं तें कर्म आटोपलें. आतां तुमचे दोघांचेहि शाप बरोबर संपले. यामुळे तुम्ही दोघेहि ह्या शरीराचा त्याग करून इष्टजनांच्या समागमाचा चिरकाल सुखानुभव घ्याल ! " इतकें बोलून ती आकाशांत गेली ! याप्रमाणे शकराजानें लक्ष्मीचे भाषण ऐकतांच त्याला पूर्वजन्मींचा सर्व वृत्तांत आठवला. मग तो वैशंपायनास ह्मणाला, आपणा उभयतां च्याहि शापांचा शेवट बरोबरच झाला, हे चांगलें झालें. " त्याच वेळेस वसंतऋतु प्रकट झाला, त्यानें विरहीजनांस फारच परराधीन केलें ! राजा व शुक यांनांहि त्यानें अत्यंत व्याकुळ केलें ! , इकडे कादंवरीहि कामसंतप्त झाली. कामदेवाचा उत्सवकाल प्राप्त झाला तेव्हां तिनें एके दिवशी संध्याकाळी स्नान करून कामदेवाचे पूजन केलें व चंद्रापीडास सुगंधि द्रव्य लावून स्नान घातले. कस्तूरीमिश्रित चंदनाची त्याच्या सर्वांगास उटी लावली व गळ्यांत पुप्पांचे हार घातले. नंतर उत्कंठेनें त्याजकडे पहात ती बसली. शेवटी मदनपीडेने व्याकुळ होऊम तिर्भ