पान:बाणभट्ट.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्षचरित व कादंबरी यांतील कांहीं ऐतिहासिक महत्त्वाचे उतारे. हर्षचरित आणि कादंबरी ह्या बाणकवीच्या दोन गद्यग्रंथांचीच फार प्रसिद्धि आहे, याकरितां त्यांतील बरेच महत्वाचे उतारे पुढे दिले आहेत. त्यांतून हर्षचरित है ऐतिहासिक गोष्टीच्या आधारानें रचले असल्यामुळे त्यांतील उतारे अधिक दिले आहेत. ब्रह्मसभेत दुर्वासऋषीनें सामगायनांत चूक केल्यामुळे सरस्वतीस हसू आवरलें नाहीं, त्यामुळे रागावून सभासदांनीं निवारण केले असतांहि दुर्वास- ऋषीने सरस्वतीस शाप दिला. तेव्हां ब्रह्मदेवानें त्याचा धिक्कार करून क्रोधाधीन होणे योग्य नाही, अशाविषयीं त्यास उपदेश केला आहे तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. 'ब्रह्मन् न खलु साधु सेवितोऽयं पन्थाः येनासि प्रवृत्तः । निहन्त्येष परस्तात् | उद्दामप्रसृतेन्द्रियाश्वसमुत्थापितं हि रजः कलुपयति दृष्टि. मनक्षजिताम् । कियूत्दूरं वा चक्षुरीक्षते | विशुद्धया हि धिया पश्यन्ति कृतबुद्धयः सर्वानथनसतः सतो वा । निसर्गविरोधिनी चेयं पयः- पावकयोरिव धर्मक्रोधयोरेक वृत्तिः । आलोकमपहाय कथं तमसि निमज्जसि । क्षमा हि मूलं सर्वतपसाम् | परदोषदर्शनदक्षा दृष्टिरिव कुपिता बुद्धिर्न त आत्मरागदोपं पश्यति । क्व महातपोभावधिकता व पुरोभागित्वम् । अतिरोपणश्चक्षुष्मानन्ध एव जनः । नहि कोप- कलुपिता विमृश्यति मतिः कर्तव्यमकर्तव्यं वा । इ० सरस्वती ही दुर्वासाच्या शापामुळे स्वर्गीतून भूतलावर उतरत असतां शोणनद तिच्या दृष्टीस पडला, त्याचें वाणानें अनेक उत्प्रेक्षाघटित वर्णन केले आहे. या शोणनदाच्या काठींच राहण्यास सरस्वतीस आवडलें. बाणाचे राहण्याचे ठिकाणहि शोणनदाच्या काठींच असल्यामुळे अर्थात् त्याचा त्याविषयी आदर असणे साहाजिकच आहे ! ' अपश्यच्चाम्वरतलस्थितैव हारमिव वरुणस्य | अमृतनिर्झर मिव चन्द्राचलस्य | शशिमणिनिष्यन्दमित्र विन्ध्यस्य । कर्पूरदुमद्रवप्रवाह