पान:बाणभट्ट.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९७ ) 6 हातांत घेऊन " अरे कारट्या ! बरा सापडलास, आतां कोठें जातोस ? तुझा सर्व स्वछंदीपणा मी काढून टाकतें ! " असे झटलें. इतक्यांत चांडाळां- च्या मुलांनी ओल्या गोचर्माचा पिंजरा आणला. त्याची अतिशय दुर्गंधि चालली होती. त्यांत तिने मला घालून त्याचे व महाश्वेतेस भेटण्याच्या आशेचें द्वार बंद केलें ! " आतां येथें खुशाल रहा ! " असें बोलून ती स्वस्थ बसली ! याप्रमाणे मी मोठ्या संकटांत पडलों असतां माझ्या मनांत आर्ले वीं, हिला आपलें सर्व वर्तमान सांगून सोडून देण्याविषयीं विनंति केली तर, जो मधुरभाषणाचा गुण मला बद्ध करण्यास कारण झाला, तोच अधिक व्यक्त केल्यासारखे होईल. कारण, मी चांगले बोलतों; म्हणून तिनें मला धरण्याचा प्रयत्न केला आहे. बरें मौन धरून उगीच बसावें तर ही रागावून अधिकच माझे हाल करील की काय कोण जाणे ! कारण, जात पडली निर्दय ! मग काय होईल तें होवो, परंतु चांडाळाबरोबर भाषण ह्मणून करावयाचे नाही, असा मी निश्चय केला व मनांत खिन्न होऊन झटलें, काय पहा ! देवलोकापासून भ्रष्ट झालों ? मनुष्यलोकीं ब्राह्मण झालों, ब्राह्मणत्वास मुकून पक्ष्याच्या योनींत जन्मलों आणि शेवटीं चांडाळाच्या हातीं सापडलों ! हा सर्व कामाधीन होण्याचा परिणाम !' मग मीं सर्व इंद्रियां- चे नियमन करून मुक्याचे व्रत घेतलें ! तिनें मीं बोलावें ह्मणून ताडण केले तरी मी बोललों नाहीं; व खाण्याचे पदार्थ आणले तरी त्यांस शिवलों नाहीं. दुसरे दिवशींहि मी तसेच केले ! तेव्हां त्या चांडाळकन्येस वाईट वाटलें, मग तिर्ने कांहीं फळे मजपुढे टाकलीं, त्यांसहि मी शिवत नाहीं असें पाहून ती मला ह्मणाली, “पशुपक्ष्यांनां भक्ष्याभक्ष्याचा विचार करण्याचें काय कारण आहे? तूं कोणी पूर्वजाति स्मरणारा असशील तर, पक्षीजातींत आहेस तोपर्यंत याचा विचार करण्याचे काय कारण आहे ? उत्तम जन्म प्राप्त होऊन तूं असे कर्म केलेस कीं, ज्याच्या योगानें अशा नीच योनींत उत्पन्न झालास. तर आतां विचार कसचा करतोस? भक्ष्याभक्ष्याचा शास्त्रार्थ पाळणारांनां देखील विपत्तिकाली प्राणधारणास अभक्ष्य चालते. मग तुला काय झाले? त्यांत फळे खावयास तर कांहींच हरकत नाहीं !" असे तिचें सशास्त्र व प्रौढ भाषण ऐकून मीं निग्रह सोडून दिला. आणि तीं फळे खाल्ली ! , याप्रमाणे कांही दिवस गेल्यावर एके दिवशी सकाळी मी डोळे उघडून पाहूं लागलों तो मी सुवर्णाच्या पिंजन्यांत आहे असे दिसलें व ती चांडाळ-