पान:बाणभट्ट.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९६ ) - पुरुष उभा आहे, असें दृष्टीस पडलें ! तेव्हां मला जीविताची निराशा वाटून मी त्यास झटलें, “ बाबा तूं कोण ? तूं कशाकरितां मला धरिलेंस ! प्रियजनाच्या भेटीकरितां मला फार दूर जावयाचें असल्यामुळे मला क्षणभर देखील उशीर नकोसा वाटत आहे. याकरितां मला लवकर सोडशील तर मोठे उपकार होतील! " तो ह्मणाला, " अरे मी जातीचा चांडाळ आहे. माझा धनी सर्वचांडाळांचा राजा येथून जवळच राहतो. त्याला एक सुंदर मुलगी आहे, ती पूर्ववयांत असल्यामुळे अर्थात् तिला चमत्कारिक वस्तूंचे मोठें कौतुक वाटत आहे. तिला कोणीं सांगितले की, जाबालिऋषीच्या आश्रमांत एक उत्तम रावा आहे. व तो सर्व कला जाणतो आहे. हें समजतांच तिर्ने तुला धरण्याकरितां मजसारखे पुष्कळ लोक पाठविले आहेत. माझें नशीब थोर ह्मणून तूं मला सापडलास ? तर आतां मी तुला तिजकडे नेतों. मग ती तुला सोडो किंवा ठेवो ! " तें ऐकून वज्रानें ताडित झाल्यासारखा होऊन मी मनांत ह्मणालों, काय ह्या मंदभाग्याच्या कर्माचा परिणाम पहा ? सर्वांनां बंद्य असा मी मुनि असून चांडाळाच्या हाती पडावें, त्यांचा सहवास घडावा, त्यांच्या अन्नानें शरीर पोसार्वे व त्यांच्या मुलाचें खेळणें व्हावें ! अरेरे ! दुरात्म्या पुंडरीका ! तुझ्या जन्माला धिक्कार असो ! असा बहुत प्रकारें शोक करून दीनवाणीनें पुनः त्यास झटलें, ' बाबा ! मी पूर्वजन्मीचा मुनि आहे. याकरितां मला सोड, ह्मणजे तुला मोठें पुण्य लागेल. दुसऱ्या कोणाला ही गोष्ट अद्याप माहीत नाहीं, मग सोडायाला काय हरकत आहे ?' अर्से ह्मणून मी त्याच्या पायां पडलों. मग तो ह्मणाला, 'वेड्या ! चांगले वाईट कर्म सर्वसाक्षी देव पाहत नाहीं काय ? याकरितां मी तसे करणार नाही. मला धन्याची आज्ञा मान्य आहे. ! ' असें बोलन तो मला घेऊन चांडाळाच्या वसतीत गेला. तेथें पाहिलं तो अतिशय घाणेरडें, केवळ दुःखांचें माहेरघरच व पाप- कमीचा बाजारच असें तें स्थान त्याच्या दृष्टीस पडलें ! त्या वेळी माझ्या मनांत आले की, ती चांडाळकन्या मजवर दया करून मला सोडून देईल काय ? असें माझें पुण्य उभे राहील? असे मी मनोराज्य करीत होतो तो त्याने मला तिजपाशी नेलें व नमन करून हा पहा मला सापडला ! " अर्से ह्मणून मला तिला दाखविलें. तेव्हां तिला फारच आनंद झाला व शाबास चांगले केले !' असे ती त्यास ह्मणाली. मग मला तिनें 6