पान:बाणभट्ट.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९५ ) , आहे ? अशा विवंचनेंत मी असतां हारीत येऊन ह्मणाला, 'वैशंपायना, तूं नशिबाचा थोर आहेस, श्वेतकेतृकडून कपिंजल तुजकडे आला आहे.' तें ऐकतांच मी उतावीळ होऊन तो कोठें आहे ? म्हणून विचारीत होतों तो तो माझ्या दृष्टीस पडला. मग मी त्यास म्हटले, " संख्या कपिंजला ! दोन्ही जन्मांत तुझी भेट अंतरली, त्यामुळे तुला किती कडकडून भेटू व किती उपचार करूं ! असें मला झाले आहे.' असें मी ह्मणत होतो तो त्यानेंच मला उचलून व उराशी घट्ट धरून पुष्कळ शोक केला. मी त्यास झटलें, 'संख्या कपिंजला ! मजसारख्या कामाधीन होणाऱ्या पाण्यानें शोक करावा. तुजसारख्या कामक्रोधादि जिंकणान्यानें तो करणे योग्य नाहीं! मग त्याला मी सर्वांचें कुशल विचारिलें, तेव्हां त्याने ते सांगितलें.' याप्रमाणे त्याजबरोबर बोलत बसलो असतां मला आपल्या पक्षिजातीचें भान देखील राहिलें नाहीं ! दोनप्रहरची वेळ झाली होती झणून हारीतानें कपिंजला- कडून फलाहार करविला. नंतर तो मला ह्मणाला, तूं शापांतून मुक्त व्हावें ह्मणून भगवान् श्वेतकेतु अनुष्ठान करीत आहेत. त्यांनी तुला सांगितले आहे की, हें अनुष्ठान संपेपर्यंत तूं येथेंच रहावेंस. मजकडे हि त्यांनी कांहीं काम सोपविले आहे. तर आतां मी जातों.' असें ह्मणून मल व हरीताला आलिंगन करून तो निघून गेला. 6 पुढें कांही दिवसांनी मला पंख फुटून चांगले उडतां येऊं लागले. तेव्हां माझ्या मनांत आले की, महाश्वेता तर तीच आहे, चंद्रापीड तेथेंच जीवंत होणार आहे. हे सर्व मला समजले असून आतां येथे काळ कशाकरितां घालवावा ? महाश्वेतेजवळ जाऊन राहिलो असता मला सुख तरी वाटेल ! अर्से मनांत येऊन एके दिवशी सकाळी सहल करीत असता उत्तर दिशे कडे भरारी मारीत चाललों ! उडण्याचा फारसा अभ्यास नसल्यामुळे कांहीं वेळानें श्रमामुळे तहान लागून घशाला कोरड पडली. पंख दमून निर्चल झाले. मग विश्राति घेण्याकरतां स्थळ पहात चाललों असतां एका सरोवराच्या कांठी दाट झाडी दृष्टीस पडली. तेथे उतरून गर्द छायेंत बसलो. नंतर गोड फळें खाऊन व तेथील थंडगार उदक प्राशून मूक व तहान भागविली. मग मार्गश्रमानें ठणकत असलेल्या अंगास विश्रांति देण्याकरितां झाडावर चढून दाट छायेंत बसलों असतां मला गाढ झोप लागली. काही वेळाने जागा झालो आणि पाहूं लागलो तो आपण जाळ्यात सापडली आहों व पुढे एक भयंकर