पान:बाणभट्ट.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

ठिकाणी व्यवहारास व शौर्यादिरसांस अनुरूप असल्यामुळे त्यांतीलच पुष्कळ उतारे दिले आहेत. कादंबरीचा प्रसार पहिल्यापासूनच हर्षचरितापेक्षां सर्वत्र फार असल्यामुळे व तीतील उतारे कै० वि० कृ० चिपळूणकर यांनी आपले निबंधांत बरेच दिले असल्यामुळे मीं ते थोडे दिले आहेत. आतां कादंबरी हा बाणकवीच्या परिपक्कदशेतला ग्रंथ असल्यामुळे यांत प्रसाद- गुण फारच उत्तम साधला आहे. तथापि हर्षचरितांतील उतारे, त्या त्या ठिकाणचे प्रसंग व रस लक्षांत आणले असतां कमी प्रतीचे आहेत, असे मात्र नाहीं ! उलट ऐतिहासिकदृष्ट्या व त्या त्या रसास अनुरूप असल्या मुळे अधिक महत्त्वाचेच आहेत यांत कांहीं संशय नाहीं !
 आतां अशा प्रकारचे ग्रंथ झटले ह्मणजे सहृदय विद्वानांखेरीज इतरांस ते प्रिय वाटणें कठीण तर खरेंच. तथापि हा निबंध बऱ्याच वाचकवर्गास प्रिय व्हावा ह्मणून निबंध लिहिणारानें आपल्याकडून पुष्कळ प्रयत्न केला आहे. यांत त्या त्या प्रसंगास शोभणारी अशी सुभाषितें, पूर्वख्यायिका, आणि बुद्ध व श्रीहर्ष ( नैषधकर्ता ) यांची प्रसंगानें दिलेली मध्ये मध्ये बोधप्रद अशी संक्षिप्त चरित्रें, तशीच हर्षचरित्रांतील व कादंबरीतील चित्तवेधक संक्षिप्त कथानकें इत्यादि अनेक प्रकार यांत घातल्याने हा निबंध सामान्य प्रतीच्या वाचकांचें देखील बरेंच मनोरंजन करील अशी आशा वाटत आहे. आतां सृष्टिकर्त्याच्या ‘ ज्ञानलबदुर्विदग्ध' खाणींतलाच कोणी एकादा हिरा असल्यास साक्षात् सरस्वतीची देखील करामत त्याच्यापुढे तुच्छ ठरेल, मग मजसारख्याची तर काय कथा !
 आपल्या कवीवर लहानपणीच मातृपितृवियोगाचा मोठा प्रसंग गुजरला होता, तरी न डगमगतां त्यानें 'विपदि धैर्य' या वचनाप्रमाणें धैर्य धरून आपल्या पदरी असलेल्या बन्याच मंडळींवर आपले वर्चस्व राखलें, चांगला विद्याभ्यास केला, देशाटन केलें, राजेरजवाडे, पंडितजन इत्यादिकांच्या भेटी घेतल्या, आणि ज्ञान व चातुर्य संपादिलें; व शेवटी राजाधिराज हर्षराजा याची भेट घेऊन, दुर्जनांनी आपल्या विरुद्ध केलेले प्रयत्न कुंठित केले आणि राजाचा आपल्यावरील रोप नाहीसा करून त्यावर आपली छाप बसवून त्यापासून अपार संपति मिळविली, व त्याचे दरबारी आपण सर्व पंडितांत मुख्य राहून हर्पराजासहि विधेचा लाभ करून दिला, इत्यादि गोष्टींचें वर्णन ह्या निबंधांत केले आहे.