पान:बाणभट्ट.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )


 ही बाणकवीची करामत पाहून भगवान् शंकराचार्य यांच्या उक्तीचें येथें स्मरण होतें:-
 दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः
 स्पर्शश्चत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् ।
 न स्पर्शत्वं, तथापि तिचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये
 स्वयं साम्यं विधत्ते, भवति निरुपमस्तेन वालौकिकोऽपि ॥ १ ॥

शतश्लोकी.


 ज्ञान देणाऱ्या गुरूला दृष्टांत देण्यास जगांत कोणतीहि तत्समान वस्तु नाहीं परिसाचा दृष्टांत द्यावा, तर तो लोखंडाचें सोनें करतो इतकेंच, परंतु स्वस्वरूप [ परीस ] बनवीत ! नाहीं ! ज्ञानरूपी गुरु तर शिष्याला आप- ल्यासारखा [ ज्ञानी ] बनवितो ! याप्रमाणें विचार करून बाणकवीनें हर्षास आपल्यासारखे विद्वान् व कवि केले! 'आपणांसारखे करिती तात्काळ' अशी प्राकृत कवीची उक्तिहि याच अर्थी आहे. आतां हें वेदांतांतील वचन आहे, तथापि तें येथेंहि बरोबर लागू पडलें आहे !
 ह्या पृथ्वीच्या पाठीवर पाहूं गेलें असतां हर्षराजासारखा सद्गुणमंडित राजा क्वचितच आढळेल. यूरोपखंडांतील सीझर, नेपोलियन इत्यादि तद्दे- शीय शूर राजांनी युद्धसंबंधी कांही टिप्पणे करून ठेवली आहेत. तर तिकडील लोक त्यांची किती तरी महती वर्णन करतात ! हर्षराजावर तर हिंमत खच विणारे मोठमोठे दुःखकारक दुर्धर प्रसंग गुजरले असतां आपल्या कविवर्या- प्रमाणे आपलें धैर्य खचूं न देतां त्यानें महान् पराक्रम करून आपल्या शत्रूचा पराभव केला, राज्याचा विस्तार केला, बाणकवीसारख्या विद्वानांच्या सहवासाने चांगलीच विद्या संपादून ग्रंथ केले व राज्योपभोगांत किंवा विषय- सुखांतच गर्क न राहतां कर्णासारखे दोन्ही प्रकारचें शौर्य दाखवून दिवा- कर मित्रासारख्या सत्पुरुषांच्या समागमानें परलोक जिंकण्याचेंहि साधन केलें !
 याशिवाय ह्या निबंधांत ध्यानांत ठेवण्यासारख्या आणखीहि गोष्टी आहेत. हर्षाचा बांधव कृष्णराज याचें निरपेक्ष परोपकारकर्तृत्वाचें वर्णन फारच प्रशंसनीय आहे. यामुळे-

" अपेक्षन्ते नच स्नेह न पात्रं न दशान्तरम्


सदा परोपकाराय रत्नदीपाइवोत्तमाः


या कवीच्या उक्तीचे स्मरण होऊन कृष्णराय हा उत्तम सज्जनांच्या कोटीं.