पान:बाणभट्ट.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )


च्या सुमारास असावा, असें विद्वज्जनांचें मत आहे. तेव्हां आख्यायिका- काव्याचे प्राचीनत्व उघडच सिद्ध होतें. इतर काव्यांच्या ऐवजी आख्यायेका काव्यांचा प्रचार चालू राहता तर ऐतिहासिक गोष्टींत चांगलीच भर पडली असती, परंतु आपल्या दुर्दैवानें तसा योग घडून आला नाहीं, ही अत्यंत खेदाची गोष्ट होय ! आतां इतिहासाचें महत्त्व लक्षांत न आणणाऱ्या इतर संस्कृत कवींकडे पाहिले असतां बाणभट्टाच्या हर्षचरिताचा आपणाला मोठाच लाम झाला आहे यांत कांहीं संशय नाहीं. यासंबंधानें बाणभट्टाची योग्यता इतर संस्कृतकवींपेक्षां देखील अधिकच समजली पाहिजे. कथाकाव्य करण्याचा क्रम देखील पुढे फारसा राहिला नाही असे दिसतें. पद्यापेक्षां गद्यांत बाणभट्टार्चे अप्रतिम कवित्व आढळून येतें. असें इतर कोणत्याहि कवीचें गद्यांत दिसून येत नाहीं. बाणभट्टानें दोन्ही प्रकारची गद्यकाव्यें रचून सर्व गद्यग्रंथकारांवर तान केली, यांत कांहीं संशय नाहीं. दंडीनेंहि दशकुमारचरित ' नांवाचें कथाकाव्य केले आहे. परंतु तें कादंबरीच्या तोडीचें उतरलें नाहीं. बाणभट्टानें याशिवाय पद्यमय काव्यें व नाटकेंहि रचिली असल्याबद्दल आधार मिळतो. तेव्हां सर्व संस्कृतकवीत बाणभट्टाची योग्यता सर्व प्रकारांनी अधिकच समजली पाहिजे. खरोखरीच पाहिले तर बाणकवीस वाणी ही अगदींच वश असल्यामुळे तिचे सर्व हृदयंगम विलास त्याच्या कवितेत सर्वत्र दृष्टीस पडत आहेत व त्यामुळे तिचे ठायीं अत्यंत मनोहरत्व आलें आहे !

'बाणेन हृदि लग्रेन यन्मंदोपि पदक्रमः
प्रायः कविकुरङ्गाणां चापलं तत्र कारणम्

 बाणाचा कवित्वरूपी बाण एकदां हृदयांत शिरल्यानंतर कोणी कविकुरं- गार्ने कविता करणे ह्मणजे व्यर्थ धडपड मात्र होय ! ह्या एका कवीच्या उक्तीप्रमाणे बाणकवीपुढे आजपर्यंत असा सरस गद्यकाव्य करणारा कोणी कवि निपजलाच नाहीं, असें ह्मटले असतां यांत बिलकूल अत्युक्ति नाहीं ! बाणभट्टानें बदललेला कवितेचा प्रवाह त्याच्यापुढे फारस। अव्याहत चालू न राहतां पुनः पूर्ववळणावरच गेला; झणजे पुनः पद्यमय व गद्यपद्यमय ग्रंथच पूर्वीप्रमाणे चालू राहिले असावे असे ध्यानांत येतें !

 हर्षचरित हैं ऐतिहासिक असल्यामुळे आणि त्यांतील वर्णनें बन्याच

१ मुतिङन्तपदांचा प्रयोग (काव्य रचणें ) पक्षी पावले टाकणे (पळणे.)