पान:बाणभट्ट.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृपया पुस्तके उपद मंडपाकडे टक लावून अश्रु ढाळीत बसला ! मग पुष्कळदा आह्मी आग्रह केल्यावर तो ह्मणाला, " हें स्थान सोडूब मी तर कधी येणार नाहीं, तुझी आपलें सैन्य घेऊन जा कसें ! " असें त्याचे उत्तर ऐकून, यास खचित वैराग्य उत्पन्न झालें, असें आह्मांस वाटले. मग आह्मीं त्यास म्हटले चंद्रा- पीडास सोडून तुला येथें राहणें योग्य आहे काय ? व तुला सोडून जाणे आह्मास तरी योग्य आहे ? आम्ही गेलों तर राजा, प्रधान व चंद्रापीड हे आह्माला काय ह्मणतील ? तर असा हेका न करतां आमच्याबरोबर चल. तेव्हां तो साश्चर्य मुद्रा करून ह्मणाला, "चंद्रापडाकडे येण्याविषयीं तुह्मी मला बोध करतां याचें मला मोठें नवल वाटतें ! त्याच्यावांचून मला क्षणभर देखील दुसरीकडे राहवत नव्हते, हे तुझांस माहीत आहेच. परंतु हल्लीं मी आपल्या स्वाधीन राहिलों नाहीं. माझी आणि कोणाची तरी चूकामूक झाल्यासारखे मला वाटतें, परंतु तें काय तें मला सांगतां मात्र येत नाही. येथून दुसरीकडे मला एक पाऊल सुद्धां टाकावेसे वाटत नाहीं. बळेंच तुझी मला न्याल तर माझे प्राण राहतीलसें वाटत नाहीं, मी अभागी आतां चंद्रापीडाच्या दर्शनसुखास मात्र अंतरलों ! मला येथून कोठेंहि जावें वाटत नाहीं, एवढे मात्र खरें; परंतु याचे कारण मला माहीत असेल तर चंद्रापीडाचीच शपथ ! असें बोलून तो तेथून उठला व अनेक वृक्षतलें, लतागृहे व देवालये पहात, जशी कांहीं त्या ठिकाणीं हरवलेली एकादी वस्तु शोधीत, हिंडूं लागला. पुढे दोन प्रहर भरले. तेव्हां आह्मीं भोजनाविषयीं त्याची प्रार्थना केली. तेव्हां तो म्हणाला, मला प्रार्थना ती कशाला ? माझे , व प्राण चंद्रापांडास प्रिय आहेत, त्याअर्थी मला ते राखले पाहिजेत. त्याच्या भेटीचीच मला इच्छा आहे, मृत्यूची नाहीं ! " असे बोलून त्यानें उठून स्नान केले व कंदमूलफळें भक्षण केली. आज नाहीं उद्यां तरी हा शुद्धीवर येईल म्हणून आम्हीं तीन दिवस वाट पाहिली. शेवटी निरुपायामुळे त्याचा कांहीं परिवार त्याजवळ ठेवून निघून आलो. हे ऐकून दुःख व आश्चर्य यांनी युक्त होऊन चंद्रापीड ह्मणाला, “वैशं- " पायनाला वनवासांत राहण्याचें काय कारण झाले असावें बरें ? माझ्या- कडून तसे कांहीं झाल्याचे मला तर आठवत नाहीं. माझ्याप्रमाणेच त्याचाहि मानमरातब आहे. वडील माणसांस दुःख देणारा व त्यांच्या आज्ञेचें उल्लंघन करणाराहि तो नाहीं, वनवासांत राहण्याचा त्याचा हा काळहि नाहीं.