पान:बाणभट्ट.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८२ ) मणाले. तें ऐकून तो फारच घाबरला व वेड्यासारखा इकडे तिकडे धावूं लागला. याप्रमाणे फिरत असतां इंद्रायुध व चंद्रापीड यांस ओळखून कांहीं राजे व सैनिक त्याजवळ धावत आले. ते उदास मुद्रेनें अश्रु ढाळीत चंद्रा- पीडास नमस्कार करूं लागले. तेव्हां “वैशंपायन कोठें आहे तें अगोदर सांगा ! " अर्से तो त्यांस घाईनें विचारूं लागला. तेव्हां महाराजांनी या झाडाखालीं थोडा वेळ बसावें ह्मणजे आह्मीं सर्व सांगतों, " अर्से ते ह्मणाले. असे त्यांचे भाषण ऐकून तो फारच घाबरला व त्यास मूर्च्छा आली. तेव्हां राजेलोकांनी त्यास सावरून धरिलें. मग तो सावध झाल्यावर वैशंपायन दृष्टीस न पडल्यामुळे मी आहें कोठें, हे आहे काय ? मी सावध आहें कां गैरसावध आहे, हे त्यास कांहींच समजेना ! वैशंपायनाची धडगत दिसत नाहीं, अर्से समजून तो भ्रमिष्टासारखा झाला. “आई, बाप, व आर्य शुक- नास यांस आतां हैं तोंड तरी कसे दाखवावें ? वैशंपायनावर कांहीं अपरिहार्य प्रसंग येऊन गुदरला, किंवा असाध्य रोगानें त्याला पछाडलें ? काय झाले तरी काय ? " मग सर्वांनी विनंति करून झटलें, महाराज, 'वैशंपायन खुशाल आहे.' हे ऐकून तो ह्मणाला, "मजवांचून तो कधीं असा एकटा राहावयाचा नाहीं, असें असून तुमच्याबरोबर कां आला नाहीं ? " , ते झणाले, " महाराज, आपण निघून आल्यावर दुसरे दिवशीं तेथून निघण्याचें ठरलें. सर्व तयारी झाली. तेव्हा वैशंपायन ह्मणाला, "अतिपुण्य- कारक अशा आच्छोदसरोवरांत स्नान करून व शिवलिंगाचे दर्शन घेऊन निघण्याचे करूं. असे झणून तो स्नानास गेला. तो सरोवराच्या कांठचा अतिरमणीय प्रदेश पहात चालला असतां वसंत ऋतूचे विश्रांतिस्थानच, असा एक सुंदर हिरवागार लतामंडप त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हां बंधु, पुत्र किंवा इष्टमित्र यांची फार दिवस भेट अंतरली झणजे जसें होतें, तसे त्याला झाले; आणि स्तंभासारखा किंवा चित्रासारखा पापणीस पापणी न लावतां त्या मंडपाकडेच पहात तो उभा राहिला. पुढे त्याचें अंग त्याला सावरून धरण्याचें न होऊन तो खाली बसला. आणि ध्यानस्थासारखा चिंतन करीत व डोळ्यांतून अश्रु ढाळीत खाली मान घालून बसला. मग आह्नीं त्यास झटलें, " दर्शनीय पदार्थाचें परमावधीभूत, असे हे स्थान त्वां पाहिले, तर चल आतां आपण स्नान करून येथून निघण्याचें करूं. " आली असें ह्मटलें तरी जसें कांहीं त्याला आमचें भाषण मुळींच ऐकूं गेलें नाहीं, अशा रीतीनें तो त्या