पान:बाणभट्ट.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

 बाणभट्टानें पुढे लिहिलेल्या हर्षचरितांतील एका प्रास्ताविक पद्यांत पूर्वीच्या आख्यायिकाकारांस वंदन केले आहे ते असं :---

उच्छ्रासान्तेप्यखिन्नास्ते येषां वक्त्रे सरस्वती ।
कथमाख्यायिकाकारा न ते वन्द्याः कवीश्वराः ।।

 साहित्यशास्त्राचे पूर्वाचार्य भामहं यांच्या आख्यायिकालक्षणांपैकी एक पद्य आढळलें तें असेंः--

" वक्त्रं चापरवक्त्रं च काव्ये काव्यार्थशंसिनि ।
सत्यार्थेन सुसंबद्धे तथोच्छ्रासैः परिष्कृते

 यावरून आख्यायिकाकाव्यें हीं प्राचीन काळी प्रचारांत होतीं, अर्से उघड दिसतें.
 संस्कृत व्याकरणशास्त्रांतील वार्तिककार कात्यायन यांच्या वार्तिकावरून तर फार प्राचीन काळीं देखील आख्यायिकाकाव्यें होतीं, असें मानण्यास कांहीं हरकत वाटत नाहीं.
 "तदधीते तद्वेद " ४२५९ ह्या पाणिनीच्या सूत्रावरच्या कात्याय- नाच्या वार्तिकांत आख्यायिकेचा निर्देश केलेला आहे तो असा-" आख्या नाख्यायिकेतिहासपुराणेभ्यश्च " या वार्तिकांत आख्यान व आख्यायिका यांचें अर्थग्रहण केलेले आहे आणि इतिहास व पुराण यांचे स्वरूप ग्रहण केलेले आहे. बाणभट्टानेंहि कादंबरीत तारापीडराजाच्या वर्णनांत व इतर ठिकाणी " काव्यनाटकाख्यानका ख्यायिका लेख्यव्याख्यानादि- क्रियानिपुणैः " - तसंच “ कदाचिदाख्यानकाख्यायिकेतिहासपुराणा- कर्णनेन–" असें आख्यायिकेचे पुष्कळ ठिकाणी निर्देश केलेले आहेत. यावरून बाणकालाच्याच नव्हे, तर कात्यायनाच्या पूर्वीहि आख्यायिका- काव्यें होतीं. कात्यायनाचा जीवितकाल ह्या कालापूर्वी अडीच हजार वर्षी-


 १ भामह याचे ग्रंथ आतां सापडत नाहींत. कांहीं ग्रंथांच्या टीकांत मात्र त्याच्या ग्रंथांतून घेतलेली प्रमाणभूत वचनें आढळतात. असें युरोपियनांच्या लेखांत उल्लेख आहेत. परंतु वररुचीच्या सूत्रावर ' प्राकृतप्रकाश नांवाची प्राकृत व्याकरणाची वृत्ति आणि दुसरा ' काव्यालंकार ' असे भामहाचे दोन ग्रंथ सांप्रत उपलब्ध आहेत.
 २ संस्कृत व्याकरण है तीन महपानी केले आहे. पाणिनीन मूलसूत्रे केली आहेत, त्यांवर कात्यायनानें वार्तिक करून पूरण केले आहे, आणि त्यांवर पतंजलीनें महाभाष्य करून पूरण केले आहे.