पान:बाणभट्ट.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

111 JAN 1994 (१५P? JAN 1994 देतां देतां तीहि निरुपयोगी झाली ! आतां तिच्या प्राणधारणाला मात्रा म्हटली म्हणजे काय ती आपल्या संबंधाचीच गोष्ट ! फार काय? तिची मूर्छा जाण्यास झाला तर, आपले नांवच कायतो उपाय. बाकी सर्व व्यर्थ ! " असे केयूरक सांगत असतां चंद्रापडाचें भान नाहींसें झालें व त्यामुळे हा तिचें ध्यानच करीत आहे काय असे वाटलें | मग तो ह्मणाला, “ मी निर्दय समजून देवीनें तुजबरोबर निरोप देखील पाठविला नाहीं ! देवी फारच मर्यादशील पडली, त्याला मी काय करावें ! चंद्रप्रकाश पडल्यावर पाझर सोडणें हें चन्द्रकांताच्या स्वाधीन आहे. परंतु चंद्रिका पाडणें हें नाहीं! वसंतलक्ष्मीनें वृक्षास आलिंगन केले तरच अंकुरोद्भव होणार आहे, नाहीं तर नाहीं ! तर यांत देवीचाच अपराध ! मी जवळ असतां तिनें लज्जा धारण करून आपली अशी अवस्था करून घेतली ! तिच्या व माझ्या नशिबींच असे दुःख भोगावयाचें होतें. अघटित घटना घडवून आणण्याविषयीं पंडित अशा दैवानें हा योग बुध्याच असा आणला असे वाटतें ! नाहीतर किन्नरांच्या जोडप्यामार्गे लागण्यापासून देवीच्या विरहापर्यंत अनेक गोष्टी कशाला घडून आल्या असत्या !" याप्रमाणें तो बोलत असतां संध्याकाळ झाला. तेव्हां सकल जगाचें जणूं शुभ्रवस्त्रच, अमृतानें भरलेला जणूं रुप्याचा कलशच ! असा चंद्र उदयास आला. त्या वेळी चंद्रापीड केयुरकासह बालोद्यानांत जाऊन जिला चंद्रोदयानें पाझर फुटले आहेत, अशा चंद्रकांत शिलेवर जाऊन बसला. मग तो त्यास ह्मणाला, केयूरका, मी जाईपर्यंत देवी आपले जीवित धारण करीलना? " तो ह्मणाला, " केंठांत आलेले प्राण आपल्या समागमाच्या इच्छेनेंच तिर्ने अद्यापपर्यंत घारण केले आहेत, याकरितां आपण लवकर गेला तरच ठीक आहे. " मग त्यानें केयूरकास विश्रांति घेण्यास सांगून आपण तेथेंच चिंतन करीत पडला. तो आपल्या मनांत ह्मणाला, " आईबापांस न कळवितां जावें तर मग समाधान कोठलें ? ज्याने सर्व राज्य माझ्या स्वाधीन केले त्या पित्यास न विचारतां गेलो तर त्यानें हजारों लोकांनिशीं मला पहात हिंडावें असें होईल. बरें, पित्याला तरी मजखेरीज दुसरें कोण आहे? बरें विचारून जावें तर त्यांना काय सांगावें ? देवी कादंबरीवर माझें प्रेम जडले आहे व त्या मुळे मी तिकडे जात आहे. असे अमर्यादपणानें कसें सांगवेल ? या वेळीं माझा मित्र वैशंपायनहि जवळ नाहीं, तर आतां कोणाला विचारावें ? " याप्रमाणे चिंतन करता करतां रात्र संपली.