पान:बाणभट्ट.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८० ) प्रातःकाळ झाला तेव्हां दशपुरीपर्यंत सैन्य आले आहे असें वर्तमान समजले. तेव्हां चंद्रापीडास मोठा आनंद झाला व थोर दैवानें मजवर मोठा अनुग्रह केला असें त्यास वाटलें. इतक्यांत केयूरक आला, त्यास तो ह्मणाला केयूरका, वैशंपायन आला ! " तो 66 ह्मणाला, वा: फार चांगले झालें ! बसंतऋतूच्या मागोमाग पल्लवांकुर येणार ह्मणून जसें निश्चित्त, तसें हल्लींच्या स्थितीवरून महाराजांचें आगमन लौकर होणारच असें ध्यानांत येतें ! वैशंपायन येऊन आपली तयारी होण्यास बराच वेळ पाहिजे. देवीची अवस्था महाराजांस कळविलीच आहे, तर आतां लवकर जाऊन देवीस आनंदाची बातमी सांगतों, ह्मणजे तिला आशा लागून जीविताचें रक्षण करावेंसें वाटेल !” 66 अशा त्याच्या भाषणानें चंद्रापीडासहि आनंद वाटला. "मग पत्रलेखेस तूं आपल्या बरोबर ने ह्मणजे देवीस भरंवसा वाटेल " असें तो ह्मणाला. मग त्यानें मेघनादास बोलावून आणिले आणि सांगितलें, “ ज्या ठिका णाहून पत्रलेखेस तूं आणिलें, त्या ठिकाणी केयरकासह तिला नेऊन पोहोंचीव. " तेव्हां तो 'आज्ञा' ह्मणून तयारी करण्यास गेला. मग केयूरक व पत्रलेखा यांजपाशीं पुष्कळ निरोप सांगून " जसें हें जग मला शून्य भासणार नाहीं, अर्से देवीस जपा ! " असे सांगून त्यानें संकटानें त्यांनां निरोप दिला. मग पत्रलेखा व केयूरक हे कादंबरीजवळ सुखरूप पोहोचतीलना ? अर्से चिंतन करीत तो बसेला. मग - वैशंपायनास सामोरे जावें अर्से मनांत येऊन तो आपले पित्याकडे गेला. त्या ठिकाणीं शुकनासप्रधानासह आपला पिता बसला होता, त्यास नमस्कार करून तो खालीं बसला. तेव्हां तारा- पीडाने मोठ्या प्रेमानें त्यास आपल्याजवळ बसविलें व त्याच्या सर्वोगा- वरून हात फिरवून झटले, – “ शुकनासा ! चंद्रापीडाकडे पाहिले कां ? " चंद्रावर जशी कलंकलक्ष्मी, तशी मदनदीपाची काजळीच, अशी ही रोमपंक्ति बालकाच्या मुखावर दिसत आहे ! विवाह करण्यास हा योग्य झाला आहे अर्से ही कळवीत आहे ! याकरितां देवीचा विचार घेऊन सुनमुख दृष्टीस पाहून आनंद करा !” - शुकनास ह्मणाला, चंद्रापीडानें सर्व विद्या व कला ह्या हस्तगत केलेल्या आहेत, प्रजेला वश केलं आहे, दिक्सुंदरींचें करग्रहण केले आहे, राजलक्ष्मीस कुटुंबवत्सल केले आहे, तेव्हां यानें वरिलें नाहीं असे काय