पान:बाणभट्ट.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७८ ) कडे त्याची दृष्टि असल्यामुळे त्यास चंद्रबिंब अगदीं तुच्छसें वाटू लागले ! तिचें मधुर भाषण कानीं पडलें होतें, त्यामुळे त्या ठिकाणी सुभाषित, गीत, वाद्यध्वनि हे गोड लागेनासे झाले ! अशा विरहावस्थेत त्यानें थोडे दिवस युगाप्रमाणे घालविले. एके दिवशी चंद्रापीड विरहावस्थेनें पीडित होऊन नगराबाहेर शिप्रा- नदीकडे फिरावयास गेला असतां पुष्कळ लोक घोड्यावर बसून कार्तिक- स्वामीचे देवळाकडे येत आहेत असें त्यानें पाहिलें. मग तो नदी उतरून देवळा- जवळ जाऊन बसला. नंतर तो येणाऱ्या मनुष्याकडे पहात असतां पत्रलेखेस जवळ बोलावून ह्मणाला, "ज्याच्या डोक्यावर मयूरपिच्छांची छत्री आहे तो केयूरकच येत आहे, अर्से वाटतें " असें बोलत आहे तो चंद्रापीड तेथें आल्याचे समजल्यामुळे पायीं येत असलेला, ज्याचा आकार अगदीं बदलून गेला आहे असा, व ज्याचें तोंड उतरून गेल्यामुळे कादंबरीची अवस्था कशी असावी हे सांगतच आहे असा केयूरक त्याचे दृष्टीस पडला ! मग त्यानें नमस्कार केल्यावर चंद्रापीडाने त्यास आलिंगन देऊन कुशल प्रश्न विचारले. व लागलींच तयार असलेल्या हत्तिणीवर केयुरक व पत्रलेखा यांसह बसून तो जलदीनें घरीं गेला. नंतर कांहीं वेळानें तो वल्लभो- द्यानांत गेला. तेथें पत्रलेखेखेरीज इतर सेवकांस दूर करून केयूरका- स जवळ बोलावून म्हणाला, " केयूरका, देवी कादंबरी व महाश्वेता यांचा मला काय निरोप आहे तो सांग बरें." केयूरक म्हणाला, “महाराज, मजजवळ कांहीं एक निरोप सांगितला नाही, परंतु देवी मला ह्मणाली, तुमच्यासारखे सेवक जवळ असून मीं अशी दशा भोगावीना ? निघा येथून | तुम्ही कोणी मला तोंड दाखवूं नका! तेव्हां देवीनें जरी कांहीं सांगितले नाहीं तरी महाराजाकडे मी जावें असं तिच्या मनांत आहे, असे समजून ती दुःखित असल्यामुळे तिला न विचारितां आलो आहे. तर महाराजांनी तेथपर्यंत येण्याची कृपा केली तरच देवीचें जीवित राहण्याची आशा आहे. तिचा मदनामि कशानेंहि शांत होत नाहीं | त्याच्या शान्त्यर्थ जों जों उपाय करावे तो तो तो अधिकच भडकत आहे ! बागेत, जलमंदिरांत, चंद्रिकंत कोठेंहि तिला चैन पडत नाहीं ! फार काय सांगावें ! मदनपीडा सोसतां सोसतां ती अगदी थकली ! तिला उपदेश करता करतां सख्यांची भाषणें सरली ! पुष्पशय्या करतां करतां बागांतील फुलेंहि संपली व औषधं -