पान:बाणभट्ट.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८) , विद्वत्ता संपादून तसाच ग्रंथरचना करण्याचाहि अभ्यास करून ' हर्षो हर्षः ह्या जयदेव कवीच्या उक्तीप्रमाणे तो कवितेच्या हर्षस्थानी राहून चांगल्या कवत गणनीय झाला ! विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा सदसि वाक्पटुता युधि विक्रमः । यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ प्रकृतिसिद्धमिदंहि महात्मनाम् || याप्रमाणे थोर पुरुषांची स्वभावसिद्ध सर्वलक्षणे हर्षराजाचे ठायीं असल्या- बद्दल आढळून येतें. हर्षराजा व बाणकवि या दोघांचा समागम सुवर्ण आणि रत्न यांच्या संयोगाप्रमाणे जमून येऊन परस्परांच्या संगतीचा परम्परांस अत्यंत उपयोग झाला ! “किंवा परेण बहुना परिजल्पितेन संसर्ग एव महतां महते फलाय । "? ही विद्वज्जनोक्ति येथें उभयतांसहि अगदी बरोबर लागू पडली ! अशा विद्यादि सद्गुणविशिष्टांची थोरवी किती जरी वर्णन केली तरी ती सर्वथैव अनिर्वचिनीय आहे, असे पंडितवर्य जगन्नाथराय यांनीं देखील झटलें आहे:- - 66 अन्या जगद्धितमयी मनसः प्रवृत्ति रन्यैव कापि रचना वचनावलीनाम् । लोकोत्तरा च कृतिराकृतिरातहद्या विद्यावतां सकलमेव गिरां दवीयः " || सारांश, थोर पुरुषांच्या सर्वच गोष्टी साकल्येंकरून कळणे अशक्य आहे !