पान:बाणभट्ट.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११७ ) . हर्षराजा यास उत्तम विद्याव्यसनाची गोडी लावून दिली, असे झणण्यास बिलकूल शंका वाटत नाहीं. कारण, हर्षाकडे जाण्याच्या वेळेस बाणानेच ' हर्षरराजाच्या येथे मोठ्या विद्वतेचें कांहीं कौतुक नाहीं ! ' ( न च तत्र विद्यातिशयकुतूहलम् ) असें झटलें आहे. बाणकवीच्या सद्गुणांविषयी हर्ष- राजाची पक्की खात्री झाल्यामुळेच त्यानें त्याचा सन्मान करून व अपार संपत्ति देऊन त्यास उच्चपदास चढविलें. * राजा मित्रं केन दृष्टं श्रुतं वा ! " ही लोकांत असंभाव्य मानलेली गोष्ट घडवून आणून बाणकवीनें ती स्वतः- च्या उदाहरणाने सर्वांच्या निदर्शनास आणून दिली ! यावरून बाणकवी- ची कर्तव्यदक्षता व योग्यता फारच मोठी होती, असे कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे ! बाणकवि हा हर्षराजाचा विश्वासपात्र, अत्यंत प्रिय, सर्व पंडितांत मुख्य, व घनकनकसंपन्न झाला होता, तरी त्यानें हर्षराजाच्या येथें ऐषआरामांतच गर्क न राहतां अमूल्य ग्रंथ रचण्यांत आपल्या आयुष्याची सार्थकता केली. हर्षराजानेंहि केवळ राजवैभवांतच किंवा शौर्यादि कर्मे करून राज्य विस्ताराच्या हव्यासांतच किंवा ऐहिक सुखांतच एकसारखं गढून न राहतां सत्पुरुष दिवाकरमित्रादिकांच्या संगतीनें 'लक्ष्मी तृणाय मन्यन्ते तद्भारेण नमंत्यपि ' या वचनाप्रमाणे नम्रपणा धारण करून दानधर्माकडे व लोकोपयोगी मार्ग, धर्मशाळा, मठ, विद्यामंदिरें बांधण्याकडे बहुतेक लक्ष्मीचा व्यय केला. हे प्रयाग येथील त्याच्या दानधर्मावरूनहि उघड होत आहे. " लक्ष्म्यास्तडित्सलिलबुबुदचंचलाया- दानं फलं परयशः परिपालनं च " || " कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिनेहितम् । हर्षेणैतत्समाख्यातं धर्मार्जनमनुत्तमम् । " हर्षराजानें शिलालेखांत स्वतः झटल्याप्रमाणे आपले वर्तन ठेवलें. या- वरून ' चित्ते वाचि क्रियायां च महतामेकरूपता' ह्या तिहींचीहि सांगड हर्ष राजाप्रमाणे जगांत क्वचितच आढळून येते ! , याप्रमाणे हर्पराजावर अनेक दुःखकारक प्रसंग कोसळले होते, तरी त्यानें संकटकाली धैर्य न सोडतां महापराक्रम करून व बाणादि कवींच्या संगतीने

  • हे संपूर्ण सुभाषित पद्य याप्रमाणे आहे:-

- काके शौचं द्यूतकारेषु सत्यं सर्पे क्षान्तिः स्त्रीषु कामोपशान्तिः । लीचे धैर्य मद्यपे तत्त्वचिन्ता राजा मित्रं केन दृष्टं श्रुतं वा ॥ V