पान:बाणभट्ट.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्षचरित्रांतील संक्षिप्त कथानक. कोणे एके काळी ब्रह्मदेव सत्यलोकी इंद्रादिदेवांसह ब्रह्मज्ञानपर गोष्टी सांगत बसला होता. त्या ठिकाणीं मनु, दक्षप्रजापति, वसिष्ठ व विश्वा मित्र इत्यादि ऋषि त्याचें स्तवन करीत होते. कोणी अनेक विषयांवर वाद करीत होते. त्यांत अत्रिऋषीचा पुत्र दुर्वासऋषि यानें मंदपालऋषीबरोबर वाद करीत असतां क्रोघांध होऊन सामगायनांत चूक केली. तेव्हां शापभीती- स्तव सर्वांनी मौन धारण केले, परंतु सरस्वतीस हसू आवरले नाहीं. तें पाहून दुर्वासऋषीस फार राग आला आणि कमंडलूतील उदक हातांत घेऊन तुला विद्येचा मोठा गर्व झाला आहे नाहीं ? तर तो मी आतां नाहींसा करतो पहा ! " असें ह्मणून " तूं या लोकापासून मनुष्यलोकीं पतन पावशील " असा त्यानें तीस शाप दिला. ते पाहून सावित्रीस राग येऊन तीहि उठून क्रोधावेशानें ह्मणाली, " हे कोपिष्टा तापसाधमा ! तूं आपल्या चूकीबद्दल सर्व देवर्षांनी वन्द्य अशा सरस्वतीस शाप दिलास काय ? " असें बोलून तीहि त्यास प्रतिशाप देण्यास तयार झाली. परंतु सरस्वतीनेंच तिचे निवारण केलें. मग ब्रह्मदेवाने सर्वांचें निवारण करून दुर्वासऋषीस झट. " साधुजनांनी सेवन केलेला हा मार्ग नव्हे. विकारवशता सर्ववृत्तींनां मलिन करते. उदक व अग्नि हे एकत्र राहू शकत नाहीत, त्याप्रमाणेच धर्म व क्रोध यांचीहि गोष्ट आहे. तपश्चर्येचें मूळ क्षमा होय. कोपाधीन राह- णारा अंधच समजावयाचा. रोषानें गढूळ झालेल्या वृत्तीस कर्तव्याकर्तव्य कोठून कळणार ? शांतीचा स्वीकार केल्याखेरीज हजारों वर्षे तप केलें तरी काय उपयोग? " मग तो सरस्वतीस ह्मणाला, “ वत्से सरस्वती ! तूं खिन्न होऊं नकोस, ही सावित्री तुजबरोबर मनुष्यलोकी येऊन तुला कर्म- णूक करील. तेथे पुत्रमुख दृष्टीस पडेपर्यंत तुझें राहणे होईल. मग तूं शाप - दोषापासून मुक्त होऊन सत्यलोकीं परत येशील. " असे बोलून ब्रह्मदेव उठून गेला. नंतर दुःखित झालेल्या सरस्वतीस पाहून सावित्री ह्मणाली, " गुणी व सज्जन यांचे ठिकाणीं देखील दुर्दैवाचे खेळ चालतात ! याकरतां आतां