पान:बाणभट्ट.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) ठेविली आहे कीं, जेथें दुर्जन असतात तेथें बहुतकरून सज्जनांचाहि योग करून ठेवलेला असतो; यामुळेच जगाची रहाटी सुरळीत चालली आहे ! हर्षाचा बांधव कृष्णराज हा सज्जन व विद्वान् यांचा पक्षपाती होता त्यास ह्या गोष्टीबद्दल फार वाईट वाटत असे. त्यानें हर्षराजाजवळ बाणकवी- च्या विद्वत्तेची थोरवी वर्णन व अनेक गोष्टी सांगून त्याच्या मनांतला रोष काढून टाकला ! ठीकच आहे. 66 अतिकुपिताअपि सुजना योगेन मृदूभवन्ति नतु नीचाः । हेम्नः कठिणस्यापि द्रवणोपायोऽस्ति न तृणादेः ॥ थोर मनाचे पुरुष फार रागावले असले, तरी त्यांस नीट समजून सांगि- तलें असतां त्यांच्या अंतःकरणास द्रव सुटतो; परंतु अधम पुरुषांच्या मनास तो सुटत नाहीं ! जसे सुवर्ण द्रवतें परंतु तृण, काष्ठ इत्यादि द्रवत नाहीं. याप्रमाणे कृष्णरायाच्या भाषणानें राजाच्या मनांला निष्ठुरपणा जाऊन त्यास दयेचा पाझर फुटला ! मग कृष्णराजाने बाणकवीस मोठ्या अगत्यानें व आग्रहानें राजाच्या भेटीस येण्याविषयीं बोलाविलें. ही त्याची परोपकार- बुद्धि व आपणावर निष्कारण प्रेम पाहूनच त्यानें “ अनपेक्षितगुणदोषः परोपकारः सतां व्यसनम् ।" असे कृष्णराजास अनुलक्षुन झटले आहे तें बरोबर आहे. असो. अशा थोर राजाकडे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे व त्याच्या स्वभावाचें मान माहीत नसल्यामुळे बाणकवीस त्यावेळी हर्षराजाकडे जाण्याचा विचार पडला होता. परंतु कृष्ण- राजाच्या प्रोत्साहनावर भिस्त ठेवून व धैर्य धरून तो हर्षराजाकडे गेला. पहिल्या भेटीसच हर्षराजा हा आपल्या भावी थोर कवीच्या धैर्याची परीक्षा पहावी म्हणूनच की काय झणझणून बोलला असतां बाण- कवीनें राजाची भीड न धरतां 'जशास तसे' या न्यायास अनुसरून सत्यास न सोडतां गंभीरपणानें सणसणीत उत्तर दिले. त्यामुळे राजा आपल्या मनांत बराच चपापला व रागास न येतां प्रसन्नतेचेंच चिन्ह दाखवून उठून गेला. यावरून ' अभियस्यच पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभः ' | या वचना- प्रमाणे कचितच योग घडून येतो ! त्यांतून तो अशा मोठ्या ठिकाणीं जमून आल्याचे पाहून मार्गे दाखल केलेल्या पद्यांतील अर्घाचा येथेंहि पुनरुच्चार केल्याखेरीज राहवलें नाहीं ! पुढे वाणकवीनें आपल्या विद्वत्तेनें व चातुर्यानें हर्षराजावर आपली चांगलीच छाप बसविली ! व आपल्यास आश्रय देणारा