पान:बाणभट्ट.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११५ ) धनधान्यसमृद्ध होता, त्यामुळे लोक निष्काळजी व सुखी असून सर्वत्र जिवंत- पणा दिसत होता ! काश्मीरचा राजा ललितादित्य याने यशोवर्म्याबरोबर युद्ध करून त्यास जिंकिलें. हा ललितादित्य इ. स. ६९५ ते ७३३ पर्यंत काश्मिर च्या गादीवर होता. एकंदरीत त्याकाली देशांत फार तरतरी होती व त्यामुळे जिकडे तिकडे पराक्रमाच्या चळवळी चालू असल्याने देशाचे स्वरूप आतां- प्रमाणे शांत न दिसतां निराळेंच जोमदार व सचेतन दिसत असावें असें लक्षांत येतें ! बाण व हर्ष यांच्या चरित्रांतील ध्यानांत ठेवण्यासारख्या कांही गोष्टी. बाण हा अगदी लहान असतांच त्याची आई वारली व त्याच्या चवदावें वर्षी त्याचा बापहि वारला, त्यामुळे त्याजवर मोठाच प्रसंग गुजरला. तथापि त्यानें आपलें धैर्य खचूं न देतां आपला विद्याभ्यासादिकक्रम चालू ठेविला होता. तो स्वतंत्र झाला असतां आणि त्याचे घरीं सरदारीथाटाचे बरेंच वैभव असतां त्यास भुलून चैनीतच न बसतां पूर्ववयांत त्याचा उप हास होत असे तरी, त्यानें थोर थोर विद्वान् गुरूंकडे जाऊन उत्तम शास्त्रा ध्ययन केले. आणि देशाटन करून व थोर पुरुषांच्या भेटी घेऊन सत्कीर्ति संपादन केली. पुढे बाणकवीच्या विद्वत्तेची कीर्ति हर्षराजाच्या दरबारापर्यंत- हि गेली. ठीकच आहे. गुणवानांत खरोखरीच चांगले गुण असले तर ते त्याच्या अगोदरच पुढें धांव घेतात ! गुणा: कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सताम् । केतकीगन्धमाघ्राय स्वयमायान्ति पट्पदाः " ही एका कवीची उक्ति अगदीं यथार्थ आहे. परंतु दुर्जनांस सुजनांच्या गुणांचा उत्कर्ष सहन न होऊन ते त्यांची दुष्कीर्ति होण्यासाठी प्रयत्न करतात, व त्यांतच मोठा आनंद मानतात ! असें बऱ्याच ठिकाणीं दृष्टोत्पत्तीस येतें. त्याप्रमाणे कांहीं दुर्जनांनी आपल्या स्वभावास अनुसरून बाणकवी विषयीं हर्षराजाचे मन कलुषित करून टाकले होते. या अनुभवावरूनच की काय त्यानें " अकारणाविष्कृतवैरदारुणादसज्जनात्कस्य भयं न जायते " ' कार- णावांचून वैर करणाऱ्या दुर्जनापासून कोणाला भय होत नाहीं ? अर्से झटले आहे तें ठीकच; परंतु जगन्नियंत्या परमेश्वरानें अशी योजना करून