पान:बाणभट्ट.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११४ ) ● - काव्यांत वर्णिलेलीं आहेत. बाणकवीप्रमाणे वाक्पतीनेंहि गौडवधकाव्यात यास ' गौड असेंच ह्मटलें आहे. कोठें ' पूर्वेकडचा राजा' आणि कोठें ' मगधाधिप ' असेंहि झटले आहे. यावरून हर्षानें जिंकलेला व जीवदान दिलेला हाच तो गौड असावा की काय असा एक तर्क मनांत उभा राहतो! सातव्या शतकाच्या सर्व पूर्वार्धीत हर्ष हा कनोज येथील गादीवर होता. आणि उत्तरार्धीत कांहीं कालानंतर यशोवर्मा हा त्याच ठिकाणी त्याचे गादी- वर बसला. ह्या संधीसच दबून राहिलेल्या गौड़ानें पुन्हां कांहीं कुरापत काढण्याचा संभव आहे. व ह्मणूनच यशोवर्म्यासहि त्यावर स्वारी करणे भाग पडले असावें. यशोवर्म्यानें गौडावर स्वारी करण्याचे व त्याला ठार मारण्याचे त्याच्या कारकिर्दीत दुसरें कांहीं मोठें कारण घडून आल्याबद्दल वाक्पतीनें आपल्या काव्यांत कोठें लिहिलें नाहीं. असे जर आहे, तर यास पूर्वीचेंच कारण असावें, असे मानण्यास काय हरकत आहे? यशोवर्मा हा ग्रहवर्म्याच्या घराण्यांतला होता, तेव्हां तो राजश्रीचा आप्त ह्मणून निराळें सांगावयास नकोच. तिच्या संबंधामुळे जर तो गादीवर बसला असला तर त्यामुळेहि गौडाचा सूड उगवण्यास अधिकच भर पडून त्यानें त्याजवर स्वारी केली असावी. किंवा पूर्वीच्या गौडाचाच हा कोणी वंशज असावा, असाहि संभव आहे. यशोवर्म्याच्या पदरी वाक्पति, भूवभूति इत्यादि कवि होते, हें मागें सांगितलेंच आहे यशोवर्मा हाहि हर्षाप्रमाणेच पराक्रमी आणि विद्याव्यसनी होता. व त्याप्रमाणें तो कविहि असल्याबद्दल मार्गे लिहिलेंच आहे. त्याच्या नांवावर प्रसिद्ध असे रामाभ्युदय नांवाचें काव्य आहे, असा शोध लागला आहे व इतर कवींनी आपल्या ग्रंथांतून त्याच्या नांवाने घेतलेली कांहीं पद्येहि सापडतात. याबद्दल पूर्वी लिहिलेंच आहे. यशोवर्मा हा इ. स. ६७५ ते ७२५ पर्यंत कनोजच्या गादीवर होता. ह्या शतकाच्या पूर्वार्धीत उत्तरहिंदुस्थानांत महापराक्रमी, विद्याव्यसनी व उदारधी असा हर्ष व दक्षिणेत सत्याश्रय पुलकेशी हे मोठे राजे झाले. त्यावेळी हूणादि राजे या देशांत आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु हर्षाच्या पूर्वजांनी व हर्षाने लढाया करून त्यांचें कांहीं चालूं दिलें नाहीं. त्यावेळी ह्या देशांतील राजे परस्परांची राज्ये घेण्याकरितां युद्धे करीत असत. तथापि देशांतले देशांत संपत्ति राहत असल्यामुळे हा देश