पान:बाणभट्ट.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

111 JAN 1994 शतकाच्या उत्तरार्धीतच होता, हे उघड झाले. त्याने आपल्या नैषध- काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या शेवटल्या कोकाच्या पूर्वार्धीत आपल्या आईबापां घ्या नांवाचा निर्देश केला आहे ते पूर्वार्ध असें:- - " श्रीहर्ष कविराजराजिमुकुटालंकारहीरः सुतं- श्रीहीरः सुषुवे जितेन्द्रियचयं मामल्लदेवी च यम् ।" यावरून त्याच्या बापाचे नांव ' श्रीहीर' व आईचें नांव 'मामल्लदेवी' असें होतें. तेव्हां हा श्रीहर्ष निराळा हैं उघडच झाले. या श्रीहर्षाने स्वतः आपणच कनोज येथील राजाच्या पदरीं असल्याचे 'नैषधचरित ' काव्याच्या शेवटी प्रशस्तीत झटले आहे, तें असेः--- तांबूलद्वयमासनंच लभते यः कन्यकुब्जेश्वरात् यः साक्षात्कुरुते समाधिषु परं ब्रह्म प्रमोदार्णवम् । यत्काव्यं मधुवर्षि धर्षितपरास्तर्केषु यस्योक्तयः श्री श्रीहर्षकवेः कृतिः कृतिमुदे तस्याभ्युदीयादियम् ॥ " यावरून हा श्रीहर्ष कनोज येथील राजाच्या पदरीं होता, हेहि उघडच झालें. श्रीहर्ष याचा पिता श्रीहीर हा जयचंद्रराजाच्या पदरीं पंडित होता. यास उदयन नावाच्या प्रतिवादीनें राजसभेत जिंकलें होतें. त्यामुळे तो आपल्या मनांत नेहमीं खिन्न असे. त्याने आपला पुत्र श्रीहर्ष यास एके दिवशीं अर्से सांगितलें कीं " जर तूं सत्पुत्र आहेस, तर माझा प्रतिपक्षी यास राजसभंत जिंक. " ही पित्याची आज्ञा त्याने विनयपूर्वक मान्य केली. नंतर सद्गुरू- पासून चितोमणिमंत्राचा उपदेश घेऊन तो गंगातीरीं देवताराधन करावया स गेला. तेथें एक वर्षमर सतत अनुष्ठान केल्यावर त्यास देवता प्रसन्न झाली व तीपासून त्यास अभिप्रेत वर मिळाला. मग श्रीहर्षाने मोठमोठ्या पंडितां जवळ अनेक शास्त्रांचें अध्ययन करून विद्वत्ता संपादिली. नंतर त्यानें राजाच्या सांगण्यावरून ' नैषधचरित ' महाकाव्य करून ते आपला स्वामी जयचंद्र यास दाखविलें. तेव्हां त्यानें काश्मीरचा राजा माधवदेव व त्याच्या पदरचे पंडित यांस ते दाखविण्यास सांगितले. त्यावरून तो काश्मीरदेशांत १. प्रथम सर्गाच्या शेवटच्या श्लोकांत त्यानें ' तचिन्तामणि मंत्रचिंतनफले शृंगार भंग्या महाकाव्ये चारुणि नैषधीयचरिते सर्गोयमादिर्गतः ॥ " यांत ' चिन्तामणि- मंत्रचिन्तनफले ' असे आपल्या काव्यास विशेषण जोडिले आहे. यावरूनहि है लक्षांत येण्यासरखें आहे.