पान:बाणभट्ट.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७८) याचा बाप ' कळश ' असें घटलें आहे ! तेव्हां श्रीहर्ष हा अर्थात् कलश- संभव झाला ! हा अपूर्व शोध त्यानीं कोठून व कसा केला हे समजत नाहीं. यावरून ह्या काव्याच्या आरंभी किंवा शेवटी कवीनें आपल्या आईबापांच्या नांवाचा वगैरे कोठें कांहीं नामनिर्देश केला आहे किंवा नाहीं, याचा शोष देखील साहेबांनी केला नाहीं, असें उघड दिसतें ! तसेंच तो इ. स. १११३ रांत कलश बापाच्यामार्गे गादीवर बसला व त्यानें इ. स. १११३ ते११२५ ह्या वर्षांच्या दरम्यान ' रत्नावली ' हे नाटक रचलें ! आतां ' रत्नावळी' इत्यादि नाटकांचा कर्ता श्रीहर्ष हा प्राचीन असून क्षत्रिय होता, व नैषधचरिताचा कर्ता श्रीहर्ष हा अर्वाचीन असून ब्राह्मण होता है। कनोज येथील राष्ट्रकूट राजांपैकी जयचंद्र किंवा जयचंद्र ह्या राजाच्या पदरीं होता. ह्या राजाने संवत् १२२५ व सवंत् १२४३ झणजे इ. स. ११६९ आणि १९८७ यावर्षी काशी क्षेत्रीं ब्राह्मणास अग्र हार दिल्याबद्दल ताम्रपत्रलेख सापडले आहेत. त्यावरून जयचंद्र जर ह्या काळीं होता तर त्याचे पदरी असलेला श्रीहर्षहि ईसवी सनाच्या बाराव्या and of 7 or 8 othor works. He is generally placed in the latter half of the 12th century. Wilson says that Shri-Har- sha succeeded his fathar Kalasha in 1113, and hat the. Ratnavali, a play ascribed to the king, must have been written by him between 1113 and 1125 the close of his reign. But the Ratnavali, must be regarded as a work of an earlier as it is largely quoted in the Dasarupa, a work of the last part of the 10th centuy. See Apte's Sanskrit. English Dictionary Appendix II. वाहवा कशासच कांही मेळ नाहीं ! हें साहेवांचे सगळेंच लिहिणे चुकीचे आहे अशा बड्या साहेबांनी नटि शोध न करितां वाटेल तशी विधानें दपटून द्यावीं में केवढे धाडस होय ! १ ' निर्णयसागर ' छापखन्यांत छापलेल्या सटीक नैषधचरितकाव्याच्या आरंभी पांडेत शिवदत्त यांचीं संस्कृत प्रस्तावना पहा. See also Indian Antiquary. Vol. I. Page 30, 297, 353, and Vol. II. Page 71. २. प्राचीन लेखमाला भाग १ लेख २२ आणि २३ पहा.