पान:बाणभट्ट.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७७) , नांबावर केवळ ' रत्नावलि ' एकच नसून याशिवाय प्रियदर्शिका व नागानंद अशीं एकंदर तीन नाटके प्रसिद्ध आहेत. यांतील सारख्याच प्रस्तावनेवरून व नांदीवरून या तीनहि नाटकांचा कर्ता हाच श्रीहर्ष असें कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे पूर्वीचें पुष्कळ राजे विद्वान् व ग्रंथकार असल्याबद्दल प्रसिद्धि आहेच; त्याप्रमाणें हाहि राजा विद्वान् व ग्रंथ- कार होता. श्रीहर्षाला रत्नावलिच तेवढी विकत घेण्याचें काय कारण पडलें होतें ते समजत नाही ! त्याच्या नांवावर आणखी दोन नाटकें प्रसिद्ध आहेत व त्यांजविषयीं कोणीं कोठें असे उल्लेख केलेले आढळत नाहीत. यावरून टीका- कारांचें झणणे बरोबर आहेर्से वाटत नाहीं. बाणकवीस द्रव्याचा हव्यासच असता तर त्यानें हर्षचरित व कादंबरी हे ग्रंथ विकले असते तर त्याला पुष्कळ द्रव्य मिळालें असतें! त्यांत हर्षचरिताबद्दल तर हर्ष राजाकडून त्यास पुष्कळच धन मिळाले असतें व रत्नावलीच्या जागी हर्षचरिताची तशी प्रसिद्धि चालू राहती. परंतु पुस्तक विकून द्रव्य संपादन करण्याइतकी बाणकवीची निकृष्ट स्थिति नव्हती, हे त्याच्या गृहस्थितीवरून कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखें आहे. त्यानें रत्नावली केली असती तरी त्यास ती विकण्याचें कांहीं एक कारण पडलें नसर्ते अर्से खचित वाटतें. कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी भवभूतीच्या निबंधांत कांहीं प्रसंगानें श्रीहर्षाच्या संबंधानें उल्लेख केला आहे तो असाः -- ‘ वरील दोहों प्रकारचे ग्रंथ ( पद्यमय व गद्यपद्यमय ) ज्यांचे अजून प्रसिद्ध आहेत असे कवि, कालिदासाखेरीज आणखी दोघेच काय ते आहेत असे वाटतें. एक श्रीहर्ष ज्याच्या नांवानें पूर्वोक्त दोन नाटकांशिवाय अति शयोक्तिरूपवर्णनादिदोष आणि मृदुत्वातिशयादि गुण यांनी युक्त असे 'नैषध-' नामक विख्यात काव्य ज्याचें प्रसिद्ध आहे तो. " . .. पूर्वोक्त दोन नाटकें ह्मणजे रत्नावलि व नागानंद हीं होत. यांवरून श्रीहर्षाची तिसरी नाटिका प्रियदर्शिका ही त्यावेळी माहीत नव्हती असे दिसतें. कै. विष्णूशास्त्री यांनी 'रत्नावली' इत्यादि नाटकांचा कर्ता व नैषधाचा ' कर्ता एकच अर्से झटलें आहे ! परंतु ती चूक आहे. तसेंच, वुइलसन् ' साहेबांनीं तर नैषधचरितकाव्याचा कर्ता श्रीहर्ष १ श्रीहर्ष The reputed author of the Naishadha-charita 6