पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केला जात असेल तर संबंधित ग्राम सभांच्या वन हक्क समित्या अशा हक्क मागण्यांच्या उपभोगाच्या स्वरुपावर विचार करण्यासाठी एकत्र बैठक घेतील आणि संबंधित ग्राम सभांना त्यातील निष्कर्ष लेखी सादर करतील. ४) परंतु जर ग्रामसभेला परस्परविरोधी हक्क मागण्यांबाबत निर्णयाकरिता अडचण असेल तर त्या उप-विभाग स्तरीय समितीकडे निर्देशित करण्यात येतील. | ५) ग्रामसभा किंवा वन हक्क समिती यांनी माहिती, अभिलेख वा दस्तऐवज मिळवण्यासाठी लेखी विनंती केल्यावर संबंधित अधिकारी त्याच्या अधिप्रमाणित प्रती ग्राम सभेकडे किंवा यथास्थित वन हक्क समितीकडे पाठवील आणि आवश्यक असल्यास अधिकृत अधिका-याद्वारे त्याचा अर्थ सुकर करण्यात येईल. वन हक्क पडताळणीसाठी ग्रामसभेकडून खालील मसुद्याप्रमाणे सूचना द्यावीः मसुदा क्रमांक ६: वन हक्क पडताळणीसाठी ग्रामसभेकडून सूचना नियम १२ (१) अन्वये वन हक्कपडताळणीसाठी सूचना वन हक्कसमिती, ग्रामसभा ----- - - सूचना दिनांकप्रति, (मागणीदाराचे नांव व पत्ता) - - - - - - - विषय:- हक्कमागणीची प्रत्यक्ष पडताळणी आपणास कळविण्यात येत आहे की, आपण वन जमीन व वन साधन संपत्तीच्या उपभोगाच्या हक्कासाठी जो दावा केलेला आहे, त्याचे स्वरुप व विस्तार तसेच तेथे उपलब्ध असलेले पुरावे त्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी वन हक्क समितीद्वारे दिनांक ----- रोजी ठीक ----- वाजता त्या ठिकाणी दौरा करण्यात येईल. आपणास आवश्यक वाटल्यास आपण पडताळणीच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहू शकता आणि त्यावेळी काही आणखी पुरावा किंवा कागदपत्रे देऊ इच्छित असाल तर ती सादर करु शकता. शिक्का सही,