पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४) जातीबद्दल शंका असल्यास अशी प्रकरणे उपविभागीय समिती संबंधित लाभाथ्र्याचा त्याचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीकडून पडताळून घेण्याची व्यवस्था करतील. वरील दोन्ही प्रकारच्या दावेदारांनी आपला विशिष्ट वन हक्क सिद्ध करण्यासाठी किमान दोन पुरावे दिले पाहिजेत. हे पुरावे कोणते असतील यासंबंधीची माहिती वर (तक्ता ख) वन जमिनींच्या हक्कांसाठीच्या दाव्यांचा अर्ज भरण्याबाबतच्या सूचना, तसेच (तक्ता ग) वन जमिनींच्या सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत सूचना या तक्त्यांच्यात दिलेली आहे. पायरी ५. वन हक्क समितीने दाव्यांची पडताळणी करणे वनहक्क समितीकडून दाव्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेलः प्रथम वनहक्क समिती मागणीदारास व वन विभागास योग्य सुचना देते त्यानंतर... क) वनहक्क समिती जागेला भेट देईल व जागेवरच दाव्याचे स्वरुप, व्याप्ती व पुरावा यांची प्रत्यक्ष पडताळणी करील आणि । ख) वनहक्क समिती मागणीदार व साक्षीदारांनी सादर केलेला सादर केलेला आणखी कोणताही पुरावा किंवा अभिलेख स्वीकारील. ग) वनहक्क समिती फिरते आदिवासी व भटक्या जमाती, (उदाहरणार्थ, मेंढके धनगर) एक तर वैयक्तिक सदस्यांमार्फत, सामूहिकरीत्या किंवा पारंपारिक सामूहिक संस्थेद्वारे त्यांचे हक्क निर्धारित करण्याकरिता केलेल्या हक्क मागणीची जेव्हा अशी व्यक्ती, समूह किंवा त्याचे प्रतिनिधी हजर असतील तेव्हा पडताळणी करण्यात आली असल्याची खात्री करील. घ) वनहक्क समिती आदिम आदिवासी गट किंवा कृषि-पुर्व समूह यांच्या सदस्यांनी त्यांच्या समूहाद्वारे असो किंवा पारंपरिक समूह संस्थेद्वारे असो त्यांच्या वसतिस्थानाचा हक्क निर्धारित करण्याकरिता केलेल्या मागणीहक्कांची पडताळणी असे समूह किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर असतांना करण्यात आली असल्याची खात्री करील. | ड) वनहक्क समिती ओळखता येण्याजोगी सीमा चिन्हे दर्शवून प्रत्येक हक्क मागणीच्या क्षेत्राचा सीमांकन नकाशा तैय्यार करील. २) वनहक्क समिती त्यानंतर हक्क मागणीवरील तिचे निष्कर्ष नोंदवील आणि ग्राम सभेपुढे ते विचारार्थ सादर करील. ३) जर दुस-या गावाच्या परंपरागत किंवा रुढीगत हद्दींच्या बाबतीत परस्परविरोधी हक्क मागण्या असतील किंवा जर वन क्षेत्राचा वापर एकापेक्षा अधिक ग्राम सभांकडून