पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिल्हा अर्ज प्राप्त दिनांक पायरी ४. वन हक्क समितीने दावे स्वीकारणे एकदा ग्रामसभेने हक्कासाठीचे अर्ज मागविण्यासाठीचा ठराव संमत केल्यानंतर अशा ठरावाच्या ३ महिन्याच्या आत अर्ज दाखल करावयाचे आहेत. (मात्र ग्रामसभेत कारणांची नोंद करुन ही वेळ वाढविण्याचा ठराव संमत होऊ शकतो.) अशा प्रत्येक हक्कासाठीचा दावा वन हक्क समितीकडे दाखल करावयाचा आहे. प्रत्येक हक्कांचा दावा वेगवेगळ्या अर्जाद्वारे करावा. समजा एखादी व्यक्ती “क्ष” गावात राहत आहे व ही व्यक्ती “य” गावातील हद्दीतील जमीन लागवड करीत आहे तेव्हा अशा व्यक्तीने “क्ष” गावाच्या वन हक्क समितीकडे दाव्यासाठीचा अर्ज दाखल करावयाचा आहे. अर्जासोबत द्यावयाचे पुरावे: हक्क दावेदार अनुसूचित जमातीचे नसल्यास, दावेदार ज्या भागात राहतो तेथील वनक्षेत्रात ७५ वर्षे राहत असल्याचा पुरावा दिला पाहिजे. या पुराव्यांमध्ये, अ) संबंधित क्षेत्रातील उपरोक्त वेळेपासून जमीन किंवा अन्य नोंदीत पूर्वज व्यक्तीपासून वंशावळ दर्शविणारी यादी किंवा दस्तावेज. | ब) ७५ वर्षापूर्वीपासून संबंधित गावात, वनक्षेत्रात राहणा-या कुटुंबाच्या पूर्वजांना किंवा समूहासंदर्भातील अन्य कोणताही पुरावा. क) गावातील ज्येष्ठ व्यक्तीचा ७५ वर्षे रहिवासी असल्याचा जबाब किंवा प्रतिज्ञापत्र. | हक्क दावेदार अनुसूचित जमातीचे असल्यास, ते अनुसूचित जमातीचे असल्याबाबतचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून द्यावे लागेल. असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यासः १) कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद असेल तर ती या कायद्याकरिता ग्राह्य धरण्यात येईल. २) नातेवाईकांच्या शाळेच्या दाखल्यावरील जातीची नोंद ग्राह्य धरण्यात येईल. ३) जातीबद्दल शंका असल्यास वन हक्क समिती संबंधित लाभार्थ्यांना निर्देश देऊन उपविभागीय अधिकारी (प्राधिकृत अधिकारी) यांचेकडून जातीचा दाखला घेऊन अर्जासोबत सादर करण्यास आदेशीत करतील.