पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिपू सुलतानाने त्याच्या राज्यात कोठेही वाढणारे चंदनाचे झाड हे राजाच्या मालकीचे आहे असे जाहीर केले होते. तो अगदी खाजगी घराच्या आवारात, शेतांवर वाढणाच्या चंदनावरही आपला हक्क बजावत होता. । मालमत्ता: सामूहिक, खाजगी, सरकारी आपल्या गारठलेल्या बेटावरच्या तुटपुंज्या निसर्गसंपत्तीवर मध्ययुगीन इंग्रजांचे काही भागत नव्हते. यासाठी ते वेग-वेगळे मार्ग शोधत होते. ह्या खटपटीतूनच आधुनिक विज्ञान विकसित झाले. ह्या क्रांतीचा एक प्रवर्तक आयमॅक न्यूटन शिवाजी-संभाजीशाहू महाराजांचा समकालीन होता. न्यूटन आणि इतर अनेक शास्त्रज्ञांनी घडवलेले विज्ञान आणि त्याच्यावर आधारलेले तंत्रज्ञान हा इंग्रजांच्या हातातला हुकमी एक्का होता. तो वापरत ते साता समुद्रावर फिरत होते. त्यासाठी त्यांनी एक अवाढव्य आरमार उभे केले होते. ही गलबते बांधताना त्यांनी स्वतःच्या बेटावरच्या जंगलांचा नायनाट केला होता. जस-जशी इंग्रजांची स्वतःची निसर्गसंपत्ति नष्ट झाली तस-तशी त्यांच्या देशात एक सामाजिक क्रान्तीही होत गेली. इतर सर्व जगाप्रमाणे, इंग्लंडातही परंपरेने जंगल, गवताळ कुरणे ही स्थानिक गावसमाजांची सामूहिक मालमत्ता होती. पण सतराव्या शतकात जिकडे तिकडे सरदार- दरकदारांनी ही भूमी गावसमाजाकडून हिसकावून घेऊन स्वतःची खाजगी मालमत्ता बनवली. त्यासाठी नवे कायदे मंजूर करून घेतले व सामूहिक मालकी अवैध ठरवली. तेव्हांपासून इंग्रजांच्या लेखी केवळ सरकारी किंवा खाजगी मालमत्ता कायद्याने मान्य राहिली. हीच पद्धती त्यांनी नंतर भारतावर लादली. भारताचे शोषण इंग्रजांना भारतभूतून मुख्यतः तीन गोष्टी हव्या होत्याः शेतक-यांकडून वसूल केलेला जबरदस्त शेतसारा; शेतजमिनीतून मँचेस्टरच्या गिरण्यांसाठी पैदास केलेली कापूस, नीळ; आणि गावसमाजांची सारी जमीन काबूत घेऊन त्यावर वाढवलेले सागवान, साल, चीड, देवदारसारखे लाकूड. इंग्रजांनी मरायांच्या आरमारातील सागवानी गलबते पाहिली होती, आणि स्वतःचा ओक संपल्यावर जहाजे बांधण्यासाठी त्यांना हा सागवान हवा होता. १७९९ साली इंग्रजांनी टिपू सुलतानाचा पाडाव करून दक्षिण भारताचा मोठा भाग आपल्या ताब्यात आणला. ह्या टिपू सुलतानाचा राजाच्या सर्व जमिनीवरच्या चंदनावरील अधिकाराचा कायदा इंग्रजांना फारच आवडला. इंग्रजांनी वनसंपत्तीवर कब्जा करण्यासाठी दुहेरी धोरण अवलंबले. सामूहिक मालकी अमान्य ठरवून गावसमाजांच्या व्यवस्थापनाखाली असलेली सर्व जमीन ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली आणायची, आणि कोठेही वाढलेले सागवानाचे झाड हे पण कंपनीच्या मालकीचे धरायचे. त्यावेळी भारतभर लहान-मोया देवरायांचे एक प्रचंड जाळे पसरलेले होते. या देवरायाही कंपनीने बळकावून भराभर तोडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातली मरायांच्या आरमारासाठी वाढवलेली सागवानाची जंगले सफाचट केली. शेतक-यांच्या शेतात घुसून सागवानाची झाडे तोडून नेण्यास सुरुवात केली. तेव्हां लोक इतके चिडले की ईस्ट इंडिया कंपनीने १८२५ च्या