पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुमारास आपले जंगलखातेच बंद केले. मग त्यानंतर तीस वर्षे देशभर पूर्णपणे बेबंद जंगलतोड होत राहिली. | मराठ्यांचा पाडाव झाल्या- झाल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ग्रंट डफने मरायांचा इतिहास लिहला. ह्या पुस्तकाची सुरुवात तो सह्याद्रीच्या देखाव्याच्या वर्णनाने करतो: घाटांत चढताना, किंवा घाटमाथ्यावर पोचल्यावर आपल्यापुढे एक चित्तवेधक, भव्य दृश्य उभे राहते. कल्पना करा: एका मागून एक तीन चार हजार फूट उंचीच्या वृक्षाच्छादित पर्वतरांगा, ज्यांच्यात झुडुपाला सुद्धा मूळ रोवायला फट सापडत नाही, असे मधून मधून डोकावणारे प्रचंड काळे फत्तर. विशेषतः पुण्याच्या दक्षिणेला सगळे सह्याद्री वर्षभर हिरवेगार असतात. पावसाळ्याच्या उत्तरार्धात सगळीकडून नदी-नाले जोरात वहात असताना ही हरितसृष्टी इतकी बहरलेली असते की आपण विस्मयचकित होतो. पण अर्धशतकानंतर जेव्हा इंग्रजांनी याच प्रदेशाची गॅझेटियरे लिहून घेतली, तेव्हा कळते की इंग्रजी अंमलाच्या पहिल्या चाळीस वर्षात ईस्ट इंडिया कंपनीच्या हावरटपणामुळे सह्याद्रीचे अनेक डोंगर उघडे बोडके केले गेले होते. वनसंरक्षण का बळजोरी? ह्या वनविध्वंसातून निर्माण झालेला असंतोष शमवणे हे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतरच्या इंग्रजांपुढच्या आव्हानांपैकी एक मोठे आव्हान होते. तेव्हां इंग्रजांनी देशात ईस्ट इंडिया कंपनीची अंदाधुंद जंगलतोड बंद करून सुव्यवस्थित वनव्यवस्थापन आणायला हवे असे ठरवले. पण हे आणणार कोठून? इंग्रजांनी स्वतःच्या देशातले जंगल तर केव्हांच नेस्तनाबूत केले होते. त्यांच्या देशात वनव्यवस्थापन ही गोष्टच अस्तित्वात नव्हती. मग या विषयातल्या तज्ञांसाठी ते युरोपाकडे वळते. युरोपखंडात कोठे कोठे थोडे फार जंगल शिल्लक होते. इंग्लंडात व युरोपीय देशांत दुसराही मोठा फरक होता. इथे सामूहिक वनसंपत्ती ही अवैध ठरवली गेली नव्हती. अनेक युरोपीय देशांत गावसमाज जंगल राखत होते. ह्यातलेच उत्तम उदाहरण आहे स्विट्झर्लंडचे. इथेही १८६० पर्यंत जंगल जवळजवळ पूर्ण नष्ट झाले होते. यामुळे प्रचंड दरडी कोसळून हाहाःकार होऊ लागला, तेव्हां लोकजागृति होऊन त्यांनी पुनश्च अरण्य वाढवायला सुरुवात केली. आज स्विट्झर्लंडची वनश्री विशेष सुस्थितीत आहे. पण ही संपूर्णतः गावसमाजांच्या मालकीची आहे. सरकारी वनखात्याच्या नाही. | इंग्रजांनी डीट्रिच बँन्डिस ह्या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाला १८६० च्या सुमारास स्थापलेल्या नव्या वनविभागाचा प्रमुख म्हणून पाचारले. बँन्डिसपुढे पहिला प्रश्न होता की किती जंगल गावसमाजांकडे व्यवस्थापनेला ठेवायचे, आणि किती सरकारने ताब्यात घ्यायचे. बँन्डिस खूपसे जंगल गावसमाजांकडे द्यावे अशा पक्षाचा होता. अनेक इंग्रज अधिका-यांनाही त्याला दुजोरा दिला. मद्रासच्या महसूल खात्याने स्पष्ट म्हटले की मोठ्या प्रमाणावर जंगल सरकारने ताब्यात घेणे हे वनसंरक्षण नाही, तर केवळ बळजोरी आहेthis is confiscation, not conservation. ह्याबरोबरच दुसरा वाद झाला फिरत्या