पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) । (१०) । पिण्याच्या पाण्याचे क्षेत्र. पूर्वी भूसंधारण-जलसंधारण केलेले क्षेत्र, पूर्वी संरक्षित वन-प्रोटेक्टेड फॉरेस्ट- असलेले क्षेत्र, (११) संयुक्त वनव्यवस्थापनाचे क्षेत्र, (१२) जेथुन गौण वनोपज गोळा करण्याचे लिलाव होतात, किवा असा अधिकार वनश्रमिकांच्या सहकारी संस्थांना देण्यात येतो असे क्षेत्र, (१३) वृक्षवर्धकांच्या सहकारी संस्थांना दिलेले क्षेत्र. गावसमाजाने ह्या सामूहिक वनसंसाधनाच्या जमिनीचा नकाशा तयार केला पाहिजे. तसेच ह्या नकाशात झाडे, पाणी, दफन-दहन भूमी, धार्मिक स्थळे, देवराया इ. संसाधने दर्शविली पाहिजेत. मोजणी विभागाकडे उपलब्ध असलेला गाव जमीन नकाशा घेऊन ह्या हद्दी दाखवता येतील. | ग्रामसभेने हे समूहाचे परंपरागत वनक्षेत्र असल्याचे व गावसमाज त्यांची वने, वन्यजीवन, सामाजिक आणि नैसर्गिक वारसा व पाणी इ. चे रक्षण करु इच्छित असल्याचा ठराव पारीत केला पाहिजे. हा ठराव उपविभागीय पातळीवरील समिती तसेच अन्य सरकारी अधिका-यांना पाठवावा. गावसमाजाने सामूहिक वन संसाधनांचे रक्षण, संवर्धन व व्यवस्थापन करण्यासाठीचा गावपातळीवरील आराखडा तयार केला पाहिजे. हे काम स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीमार्फत करवता येईल. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने वनाधिकार कायद्याबद्दलच्या पुस्तिकेत वन जमिनींच्या सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. तक्ता ग: वन जमिनींच्या सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत सूचना भारत सरकार / जमाती कार्य मंत्रालय/ अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कमान्य करणे) नियम, २००८: नमुना-ख. (पहा नियम ११ (१)(क)व(४)) मागणीदाराचे नांव:- या स्तंभामध्ये मागणीदाराने समुहाच्या व्यक्तींची पूर्ण नावे लिहून सही करावयाची आहे अथवा अंगठ्याचा ठसा उमटवावयाचा आहे. १.(क) अनुसूचित जमातीचा समूह आहे? :- या स्तंभामध्ये मागणीदार अनुसूचित जमातीचे असल्यास होय समोर / अशी खूण करावी व