पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जोडीला जैवविविधता कायद्यातील तरतुदींप्रमाणे गावसमाज जैवविविधतेच्या नियमबद्ध वापरासाठी बाहेरील लोकांकडून, तसेच स्थानिक सदस्यांकडून संग्रहण शुल्क (collection charges) वसूल करू शकते. ह्या नियमांचे पालन होत नसल्यास, ग्रामसभेला योग्य ती पावले उचलण्याचे अधिकारही आहेत (कलम ५ (d)). म्हणूनच जर वनविभागाला देखील गुरचरण जमीन किंवा सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करायची असेल, तर ह्या सामूहिक वनसंसाधनावर असलेले अधिकार समूहाचे आहेत असे म्हणून ग्रामसभा हे काम थांबवू शकते. अशा ठिकाणी बेकायदेशीर रीत्या झाडे तोडली जात असल्यास ती थांबविण्याचा कायदेशीर अधिकार गावसमाजाला आहे. जंगल जर खाण किंवा इतर कामासाठी वापरले जात असेल तर हे जंगल सामूहिक वनसंसाधन आहे व त्यांचे मूळ रहिवासाचे स्थान तसेच सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा भाग असल्याने त्यावर त्यांचा हक्क आहे व त्याचे रक्षण करण्याचा त्यांना अधिकार आहे असा दावा ग्रामसभा करु शकते. याचा अर्थ वनविभाग किंवा सरकार किंवा जंगल लुटारुंनी काहीही ठरविले तरी गाव समाज त्याला विरोध करुन गाव समाजाचे निर्णय अमलात आणू शकतात आणि त्यांच्या जंगलांचे रक्षण करु शकतात. शिवाय गावसमाज रोजगार हमी योजनेखाली सामूहिक वनभूमीवर वनीकरणाचे वेगवेगळे उपक्रम राबवून रोजगार तर मिळवू शकेलच, पण त्याबरोबर संसाधनांची जोपासना करून शाश्वत स्वरूपात स्वयंरोजगाराच्या शक्यता निर्माण करू शकेल. हा हक्क शाबित कसा केला जाऊ शकेल? गावसमाजाने त्यांच्या परंपरागत सामूहिक वनसंसाधनाच्या जमिनीच्या हद्दी प्रत्यक्ष निश्चित केल्या पाहिजेत. हे गावच्या परंपरागत हद्दी किंवा पाड्याच्या हद्दी लक्षात घेऊन, व गावातील लोक कोठून कोठून गौण वनोपज, औषधी वनस्पती गोळा करतात, मासे पकडतात, गुरे चारतात, देव रायांची उपासना करतात ह्या सर्वाचा विचार करून ठरवले पाहिजे. तसेच शेजारच्या गावाशी सल्ला मसलत करुन करावयास हवे. ह्या संदर्भात खालील गोष्टी विचारात घ्याव्याः निस्तार हक्क क्षेत्र, पूर्वी अथवा सध्या फिरती शेती जेथे केली जाते ते क्षेत्र. पारंपारिक गुरे चराईचे क्षेत्र, गोचर, गायरान, | (४) सरपण, पाला-पाचोळा, कंदमुळे, चारा, रानचा मेवा, मासेमारी, खेकडे,शिंपले-तिस-या गोळा करणे, जनावराना पाणी पाजण्याची प्रथा असलेले क्षेत्र, औषधी वनस्पती गोळा करण्याची प्रथा असलेले क्षेत्र, पवित्र वनस्पती, पशू, शिळा, तळी, देवराया असलेले क्षेत्र, दफनभूमी, स्मशान असलेले क्षेत्र. (१) (२) (३ ए 9