पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाव वन हक्कसमिती गाव तालुका जिल्हा अर्ज प्राप्त दिनांक वन हक्कसमितीची स्थापना करणेः | वन हक्क नोंदीच्या दाव्यासाठी बोलविलेल्या ग्रामसभांना २/३ गणसंख्येची आवश्यक आहे. ग्रामसेवक ह्या ग्रामसभांचा सचिव असेल. वनहक्क समितीची स्थापना करण्यासाठी ग्रामसभेत दहा ते पंधरा जणांची समिती निवडून तसेच या सदस्यांमधून अध्यक्ष व सचिवाची निवड करुन त्यांच्या नावाच्या यादीसह ठराव संमत करावयाचा आहे. हा ठराव उपविभागीय अधिका-याकडे पाठवावयाचा आहे. या समितीमध्ये किमान १/३ सदस्य अनुसूचित जमातीचे व किमान १/३ महिला सदस्य असावयास हव्या. महाराष्ट्र शासनाने सुचवले आहे की: १) ग्राम सभा यांनी १०वी किंवा १२वी पास असलेल्या एक किंवा दोन सदस्य वन हक्कसमितीत निवडावे. २) वनहक्क समितीच्या सदस्यांनी गावातील इयत्ता १०वी किंवा १२वी पास असलेल्या सुशिक्षितांना सदस्य सचिव म्हणून निवडावे. पायरी ३. ग्रामसभेने सामूहिक वन संसाधने व सामूहिक वन संपत्तीचे क्षेत्र ठरविणे परंपरागत वनांचे रक्षण करण्याचा हक्क हा या कायद्यातील हक्कांपैकी एक मोठा महत्वाचा हक्क आहे (कलम ३ (१) (i) व कलम ५). ह्या कायद्यामुळे गाव समाजाला कोणत्याही सामूहिक वन संसाधनाचे रक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन, तसेच व्यवस्थापन करता येऊ शकेल. शिवाय कोणत्याही जंगलातील झाडे, जैवविविधता, वन्यजीव, पाण्याचे स्त्रोत इ. चे रक्षण करण्याचे पूर्ण अधिकार त्यात आहेत. गाव समाज त्यांच्या वहिवाटीच्या जंगलाचे तसेच सांस्कृतिक व नैसर्गिक वारसांचे (जसे देवराया, धार्मिक स्थळे इ.) विनाशापासून रक्षण करु शकते. ग्रामसभा सामूहिक वनसंसाधनाचे वन्यजीवन, वने व जैवविविधता वापरासाठी मुभा व रक्षण व वापरासंबंधीचे नियमन करू शकते. याच्याच