पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९.(ख)। पारंपारिक वन निवासी आहे? :- मागणीदार पारंपारीक वन निवासी असल्यास या स्तंभामध्ये होय समोर ५ अशी खूण करावी आणि (१) पारंपारिक वन निवासी असल्याचे (तीन पिढ्यांपासून वनात रहाण्याबाबत व उपजिविकेच्या ख-या खुच्या गरजांसाठी वन/वनजमिनीवर अवलंबून असल्याबाबत) पुराव्याची प्रत जोडावी. (पहा अधिनियमाचे कलम २(ण)) (२) पती/पत्नी अनुसूचित जमातीचे असल्यास जमातीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत जोडावी. १०. कुटुंबातील अन्य सदस्यांचे नांवेः- मागणीदारावार अवलंबून असणा-या सर्व मुले व प्रौढ व्यक्ती यांची नावे या तक्त्यामध्ये लिहावीत. जर तक्त्यामध्ये व्यक्तींची नावे लिहिण्यास जागा अपुरी पडत असेल तर या अर्जास स्वतंत्र कागद जोडावा. अ.क्र.: येथे अनुक्रमांक लिहावा. १०.२ नाव:- या स्तंभामध्ये मागणीदारावर अवलंबून असणा-या व्यक्तीचे पूर्ण नाव लिहावे. १०.३ स्त्री/पुरुषः- मागणीदारावर अवलंबून असलेली व्यक्ती स्त्री अथवा पुरुष असेल त्याप्रमाणे स्त्री अथवा पुरुष असे या स्तंभामध्ये लिहावे. १०.४ वयः- मागणीदारावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे वय या स्तंभामध्ये लिहावे. १०.५ अर्जदाराशी नातेः- मागणीदारावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे मागणीदाराशी असलेले नाते या स्तंभामध्ये लिहावे.

० जमिनीवरील दाव्यांचे स्वरुप १. ते ६ या स्तंभामध्ये दाव्यातील वन जमिनीचे क्षेत्र एकर/हेक्टर मध्ये लिहावे. तसेच सदर क्षेत्राचे स्थळ उदा. कम्पार्टमेंट नंबर/सर्वे नंबर/ गाव नमुद करावे. ताब्यात असलेल्या वन जमिनीची व्याप्ती