पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संभाव्य पुरावे : (क) निस्तार पत्रक (ख) वनावरील पारंपारिक हक्कासंबंधीचा कोणताही अहवाल. या संदर्भात मसुदा क्र. ३ मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांकडे उपलब्ध असलेले प्रथम बंदोबस्त मिसल व नकाशे खास उपयुक्त ठरतील. (ग) ज्येष्ठ व्यक्तींचे जबाब (घ) चराई पावती ह्या हक्काची मागणी कशी करावी? संबंधित गावक-यांनी वन हक्कसमितीकडे सामूहिक अर्ज करावा. लक्षात असू द्या की, गौण वनोपज व गुरे चारणे, मासेमारी वरील हा हक्क संपूर्ण गावासाठी आहे. ग्रामसभा बोलावताना वन हक्कांबाबत दावा दाखल करण्यासंबंधी ग्रामसभेकडून खालील मसुद्याप्रमाणे सूचना द्यावी.


मसुदा क्रमांक ५: वन हक्कांबाबत दावा दाखल करण्यासंबंधी ग्रामसभेकडून सूचना

(अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ च्या कलम ६(१) व अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्काची मान्यता) नियम २००८ चे कलम ११(१) पहा) दिनांक_--- सर्व साधारण व ग्रामसभा --------(ग्राम पंचायत ------- तालुका ------) येथील सर्व सदस्यांना या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम २००६ च्या कलम ६(१) प्रमाणे अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी (वन हक्कांची मान्यता) नियम २००८ च्या कलम ११(१) नुसार त्यांच्या व्यक्तिगत व सामूहिक वन हक्कासंबंधी दावे ही सूचना दिल्याच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यापर्यंत स्विकारण्यात येतील. सदरहू दावा सचिव, वन हक्कसमिती, ग्राम सभा---- (पत्ता) --------- वर दाखल करता येतील. | दाव्यांच्या सत्यतेसाठी समर्थनीय कागदपत्रे सादर करावयाची असल्यास ते दाव्याच्या पत्रासोबत सादर करु शकतात. कागदपत्र दाखल केल्यानंतर तशी पावती जरुर घ्यावी. सदरहू व्यक्तीगत दाव्यासोबत वरील अधिनियमाच्या कलम ६(१) आणि नियम १३(१) अन्वये, व सार्वजनिक वन हक्कासंबंधी दाव्यासोबत नियम १३(२) प्रमाणे कोणीही अथवा जे दावेदारास योग्य वाटेल ते पुरावे सादर करु शकतो. ही सूचना ग्राम सभेत झालेल्या प्रत्यक्ष ठरावानुसार पाठविण्यात येत आहे.