पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतो. मात्र अशा राजवटी खालसा करण्यात आल्यानंतर हे हक्क नष्ट करण्यात आले किंवा राज्य सरकारमध्ये विहित करण्यात आले. या संबंधातील निस्तार पत्रके उपलब्ध नसल्यास ती संबंधित परिक्षेत्र वन अधिका-याकडे वनधिकार तसेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त करुन घेता येतील. । या संबंधातील नियमात गौण वनोपजाची केवळ डोकीवरुन, हातगाडी किंवा सायकसवरुनच वाहतूक केली जाऊ शकेल असे म्हटले आहे. यातील वाहतुकीसाठी मोटरगाड्यांच्या वापरास परवानगी नाही. गौण वनोपजावरील हक्कासाठी अर्ज कसा करावयाचा? | या संबंधातील दावा पूर्ण समूहाला करावा लागेल. अशा समूहाच्या वतीने काही गावकरी वन हक्क समितीकडे अर्ज करु शकतील. या अर्जासोबत गोळा केल्या जात असलेल्या वनोपजाचा सर्व प्रकारचा तपशील व असे वनोपज ज्या वनविभागातून गोळा केले जात आहेत त्याचा तपशील जोडला पाहिजे. ह्या तपशिलात गौण वनोपजाचे परिमाण द्यावे असे म्हटले आहे. परंतु इतका बारकाव्याचा तपशील फार क्वचित् उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, कर्नाटक राज्याच्या योजना मंडळाने केलेल्या अभ्यासाप्रमाणे राज्य वनविभागाकडे राज्यात व्यापारी उपयोगात असलेल्या ३०० औषधि वनस्पति प्रजातींपैकी केवळ २७ प्रजातींच्या वापरातील परिमाणाबाबत अगदी जुजबी माहिती उपलब्ध होती. इतर २७३ प्रजातींबद्दल काहीही माहिती उपलब्ध नव्हती. तेव्हा ग्रामसभेने पहिल्या सभेतच या संदर्भात शासकीय विभागांकडे या पद्धतीची जी काय माहिती उपलब्ध आहे ती पुरवावी अशी मागणी मसुदा क्र. ४ प्रमाणे करावी, अशी खास काही माहिती उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. आपल्या दाव्यात वननिवासियांनी आपण जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गठन करून, तिच्या द्वारे सतत निरीक्षण करत राहून, काळजीपूर्वक जास्त हानि हाणार नाही एवढ्या प्रमाणात उपयोग करू असे मांडावे. यापलीकडे जाऊन निश्चित एकच परिमाण देणे अनुचित वाटते. वापराचा हक्क : गुरे चारणे, मासेमारी इ. (कलम ३ (१) (d)) आदिवासी व पारंपारिक स्थायिक तसेच फिरस्त्या वननिवासींना त्यांची गुरे-ढोरे चारण्याचा हक्क आहे. धनगर व इतर फिरस्त्या पशुपालक समूहाला हंगामी काळात जंगल जमिनीवर असा हक्क शाबीत करण्यासाठी व्यक्तिगत किंवा पशुपालक समूहाच्या परंपरागत संस्थेला अर्ज दाखल करता येईल. ज्या ग्रामसभेत ह्या समूहाचे प्रतिनिधी हजर असतील अशा ग्रामसभेत ह्या हक्काच्या मागणीची पडताळणी करावयाची आहे. वननिवासींना जलाशयात आढळणारे मासे, खेकडे, कालवे इत्यादि जलचर पकडण्याचा देखील अधिकार आहे. गुरे चारणे-मासेमारी इ. बाबतच्या हक्कासाठी अर्ज कसा करावा? गौण वनोपजावरील हक्काप्रमाणे.