पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

i) कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता आधी जंगल जमिनीवर मालकी असलेल्या व्यक्तीला हुसकावून लावल्यामुळे न सुटलेला विवाद (महाराष्ट्रातील खाजगी वन जमीन संपादन कायदा) | ii) महसूल व वनविभाग अशा दोघाहीमार्फत दावा करण्यात आलेली किंवा जेथे वन विभागाकडे जमीन द्यावयास हवी होती, तेथे ती वन विभागाकडे हस्तांतर झालेली नाही अशा प व हक्क पत्रके दिलेल्या जमिनी उदा. मध्यप्रदेश व छत्तीसगड मधील ‘ऑरेंजक्षेत्र iii) प असलेल्या ठिकाणी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेविना रद्द करण्यात आलेले प घ) विस्थापित व्यक्तीचे जमीन हक्ककलम ३ (१) (m) व ४ (८) ह्या जमिनीसाठी दावे कसे करावेत? अशा जमिनीचे दावे मान्य होण्यासाठी खालील गोष्टी पुराव्याद्वारे सिद्ध कराव्या लागतील. अ) दावेदार जमीन प्रत्यक्ष लागवड करीत आहे. ब) १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून सदर जमीन लागवडीखाली आहे. क) या व्यतिरिक्त कलम ३ (१) (अ) अंतर्गत हक्क दारांना (म्हणजेच वहिवाटीखालील जमिनींबाबत) सदर जमिनी ३१ डिसेंबर २००७ रोजी दावेदारांच्या कब्जात असल्याचे सिद्ध केले पाहिजे. गौण वनोपजावरील हक्क(कलम २ (i) व ३ (१) () व ३ (१) (b)) ह्या कायद्याअंतर्गत जंगलनिवासी गौण वनोपजावर हक्काचा दावा करु शकतात. गौण वनोपजामध्ये बांबू, झाडांचे बुंधे, फुलोरा, वेत, कोष, मध, मेण, लाख, तेंदूपत्ता, औषधी वनस्पती, मुळे, कंद यासारख्या इतर अनेक उत्पादनांचा समावेश होतो. (कलम (२) (i)). असे असले तरीही जे वनोपज परंपरागत गोळा केले जात आहेत त्याच संपत्तीवर हक्क मागितला जाऊ शकतो. वनोपजावरील हक्कामध्ये मालकी हक्क , वनोपज गोळा करणे, वापर व विल्हेवाट लावणे (विनिमय व विक्री किंवा देवाण-घेवाण) यांचा समावेश आहे. मात्र यासंबंधातील वाहतुकीवर काही निबंधही आहेत. परंपरागत गोळा केल्या जाणा-या गावच्या हद्दीतील किंवा हद्दीबाहेरील कोणत्याही वनविभागात हे वनोपज गोळा करता येईल (कलम ३ (C)). जेथे वनोपज गोळा करणे हे परंपरागत निस्तार हक्काचा भाग होते तेथे समूहाला या संदर्भात परंपरागत हक्कासाठी दावा करता येईल व नोंदविता येईल. (कलम ३ (१) (b)) संस्थाने किंवा जमीनदारी राजवटीत नोंदला गेलेल्या निस्तार हक्काचाही यामध्ये समावेश