पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गट ग्रामपंचायतीने वन हक्क नोंदीच्या दाव्यासाठी बोलविलेल्या पहिल्या ग्रामसभेत हजर राहून महसूल गावे/ वाडी/ पाड्यांच्या स्वतंत्र ग्रामसभा घेण्याचा ठराव पारीत करावा व ह्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा. परंतु गट ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेत महसूल गावे/ वाडी/ पाड्यांच्या स्वतंत्र ग्रामसभा घेण्याचा ठराव पारीत न झाल्यास याच सभेत वनहक्क समितीची स्थापना करावी. एरवी अशा वनहक्क समितीची स्थापना ही पुढील पायरीत महसूल गावे/ वाडी/ पाड्यांच्या स्वतंत्र ग्रामसभांच्यात करावी. वनहक्क समितीची स्थापना कशी करावी याचा तपशील पुढे {५३.३.३ वन हक्कसमितीची स्थापना करणे} या कलमात दिला आहे. | मुद्दाम लक्षात ठेवावे की वन हक्क नोंदीच्या दाव्यासाठी बोलविलेल्या ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीत शासकीय विभागांना सर्व उतारे, नकाशे इत्यादि माहिती पुरवण्यासाठी खालीलप्रमाणे लेखी विनंति पाठवावी. ही सर्व माहिती पुढील प्रक्रियेसाठी विशेष जरुरीची आहे. ती मिळवण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. वर प्रकरण ८मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने वनाधिकार कायद्याबद्दल एक पुस्तिका छापली आहे. या पुस्तिकेत कायद्याअंतर्गत करावयाच्या अर्जाचे, ठरावांचे नमुने दिलेले आहेत. या पुस्तिकेत सुचविल्याप्रमाणे ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीची सूचना खालील मसुद्याप्रमाणे द्यावी. - - - - - - - - - - - - - - मसुदा क्रमांक १: ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीची सूचना (अनुसूचित जमाती व इतर वन निवासी वन हक्काची मान्यता २००८ चा नियम ४(१) पहा) जिल्हा --------- तालुका -------- ग्रामपंचायत-------- ग्रामसभेच्या सर्व सदस्यांना या पत्रकाद्वारे सूचित करण्यात येत आहे की ग्राम सभेची पहिली बैठक खाली दिलेल्या दिनांक, वेळेनुसार घेण्यात येणार आहे. बैठकीचे स्थान____ दिनांक -------- वेळ_----- ग्रामसभेचे सर्व सदस्य, ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे, हे या सभेसाठी आमंत्रित आहेत. ग्रामसभेसाठी, तिच्या सदस्यांच्या एकूण दोन तृतीयांश एवढी संख्या गणपूर्तीसाठी ग्राह्य मानली जाईल. सभेमध्ये प्रत्यक्ष खालीलप्रमाणे विषय ठेवले जातील व त्यावर खालील क्रमानुसार विचार करण्यात येईल.